अहमदनगर, 20 मे : राज्यात कोरोनाच्या (Corona) बिकट परिस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजपचे (BJP) नेते दौरे करत आहे. पण, नगरमध्ये एका आरटीआय कार्यकर्त्याने (Right to Information) यावर आक्षेप घेतला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे तक्रार केली आहे. तसंच, फडणवीस यांच्याकडे दौरे करण्याआधी परवानगी आहे का, अशी विचारणाही राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचा दौरा केला होता. अचानकपणे हा दौरा केल्यामुळे आरटीआ कार्यकर्ते संजय काळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. कोरोनाच्या काळात फडणवीस यांच्याकडे जिल्ह्याची सीमा ओलांडण्यासाठी नियमाप्रमाणे अर्ज केला आहे, अशी विचारणा माहितीच्या अधिकारातून मुख्य सचिवांकडे केली आहे. कोपरगावात भाजपच्या आमदाराने कोविड सेंटर सुरू केले आहे. या कोविड सेंटरला भेट देण्यासाठी फडणवीस कोपरगावात दाखल झाले होते. त्यामुळे संजय काळे यांनी याबद्दल शंका व्यक्त करत तक्रार दाखल केली आहे, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्स ने दिले आहे. VIDEO : दलदलीत अडकलेल्या हत्तीची वनविभागाकडून सुटका, हत्तीनं मानले आभार राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केला आहे. तसंच जिल्हाबंदीचे आदेश सुद्धा दिले आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी फडणवीस यांच्याकडे ई-पास होता का? 10 पेक्षा जास्त लोकांची गर्दी करण्यास मनाई आहे, असं असताना फडणवीस यांच्या कार्यक्रमांना एवढी गर्दी कशी काय जमा होते? यावर प्रशासन, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने काही कारवाई केली का, अशीही विचारणा काळे यांनी केली. शारीरिक संबंधांसाठी BFसमोर ठेवलेली अट महागात; तीनदा गाठलं हॉस्पिटल, अखेर ब्रेकअप कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी करू नये, अशी राज्य सरकारची सक्त सूचना आहे. पण, राजकीय नेत्यांकडून ठिकठिकाणी गर्दी केली जात आहे. ज्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण दाखल आहे, अशा ठिकाणी राजकीय नेते कार्यक्रम घेऊन गर्दी करत आहे. याबद्दल वारंवार तक्रार दिली पण कुणीही दखल घेतली नाही, असा संताप काळे यांनी व्यक्त केला. त्यामुळे, आता तरी प्रशासनाने कोपरगावात झालेल्या गर्दी प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.