मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : दलदलीत अडकलेल्या हत्तीची वनविभागानं केली सुटका, हत्तीनं अनोख्या पद्धतीनं मानले आभार

VIDEO : दलदलीत अडकलेल्या हत्तीची वनविभागानं केली सुटका, हत्तीनं अनोख्या पद्धतीनं मानले आभार

दलदलीत फसलेल्या हत्तीला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढत त्याचा जीव वाचवला (Rescue Operation of Elephant). या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Viral on Social Media) व्हायरल झाला आहे.

बंगळुरु 20 मे : प्राणी माणसांनी केलेली मदत कधीच विसरत नाही, असं म्हटलं जातं. हे खरंच असल्याचा प्रत्यय नुकतंच एका घटनेतून आला आहे. या घटनेत दलदलीत फसलेल्या हत्तीला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढत त्याचा जीव वाचवला (Rescue Operation of Elephant). या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Viral on Social Media) व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मादा हत्ती चिखलाच्या दलदलीत अडकली आहे आणि यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. विनविभागाचे अधिकारी या हत्तीला जेसीबीच्या मदतीनं बाहेर काढतात. ही घटना कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील अवरेगुंडा गावातील आहे.

अधिकाऱ्यांना याठिकाणी एक हत्ती दलदलीत अडकल्याची माहिती मिळाली होती. यानंतर वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली. वनाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीनं अनेक प्रयत्नांनतर या हत्तीला दलदलीतून बाहेर काढलं. दलदलीतून बाहेर निघताच हा हत्ती जेसीबीकडे आला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना वाटलं, की हत्ती त्यांच्यावर हल्ला करणार आहे.

दलदलीतून बाहेर निघाल्यानंतर हत्तीनं जेसीबीच्या पुढच्या भागावर आपलं डोकं वारंवार जोरजोरानं आदळण्यास सुरुवात केली. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या वन अधिकाऱ्यांनी हत्तीला तिथून हटवण्यासाठी फटाके फोडले. फटाक्यांचा आवाज ऐकून हत्ती जंगलात पळून गेला. हत्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाला. यूजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

काही यूजर्सचं असं म्हणणं आहे, की हत्ती जेसीबीवर आपलं डोकं आदळून घेत आभार मानत आहे. साराभाई वर्सेस साराभाई अॅक्टर सतीश शाहनं बुधवारी आपल्या ट्विटवरुन ही पोस्ट शेअर करत हत्तीला वाचवणाऱ्या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं.

First published:
top videos

    Tags: Elephant, Rescue operation, Video viral