मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सेक्ससाठी बॉयफ्रेंडसमोर ठेवलेली अट मॉडेलला पडली महागात; 3 वेळा गाठलं हॉस्पिटल, अखेर केलं ब्रेकअप

सेक्ससाठी बॉयफ्रेंडसमोर ठेवलेली अट मॉडेलला पडली महागात; 3 वेळा गाठलं हॉस्पिटल, अखेर केलं ब्रेकअप

मॉडेलच्या अटीनुसार तिला हवा तसा बॉयफ्रेंड मिळाला पण...

मॉडेलच्या अटीनुसार तिला हवा तसा बॉयफ्रेंड मिळाला पण...

मॉडेलच्या अटीनुसार तिला हवा तसा बॉयफ्रेंड मिळाला पण...

  • Published by:  Priya Lad

ब्रिटन, 20 मे : प्रत्येकाने आपल्या जोडीदाराबाबत (Life partner) काही स्वप्नं रंगवलेली असतात. तरुणांना सुंदर, नाजूक अशी गर्लफ्रेंड (Girlfriend) हवी असते. तर तरुणींना भारदस्त आणि पिळदार शरीराचा बॉयफ्रेंड (Boyfriend) हवा असतो. काही जणांसाठी बाह्य नाही तर शरीराचं आंतरिक अंग महत्त्वाचं असतं. रूपापेक्षा सेक्स (Sex) त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो आणि तसाच जोडीदार त्यांना अपेक्षित असतो. अशीच अपेक्षा ठेवून तशी अट घालून अगदी तसाच बॉयफ्रेंड मिळवणं एका मॉडेलला चांगलंच महागात पडलं आहे.

ब्रिटनची मॉडेल आणि टीव्ही स्टार ट्रेसी किसने (Tracy kiss) तिला हवा तसा बॉयफ्रेंड मिळवला. सेक्ससाठी तिने जी अट ठेवली होती ती पूर्ण करणारा असाच तिचा बॉयफ्रेंड होता. पण तिच्या याच अटीमुळे तिला तीन वेळा रुग्णालयात जावं लागलं. अखेर वर्षभराने तिने ब्रेकअपही केला. ट्रेसनी स्वतःचा आपल्या या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे.

ट्रेसी एक फिटनेस ट्रेनर आहे. तिला दोन मुलंसुद्धा आहेत. काही वर्षांपूर्वीच एका अडल्ट रिअॅलिटी शोमध्ये ती दिसली होती. ट्रेसी आणि तिचा बॉयफ्रेंड मार्क यांची भेट एका रिअॅलिटी शोच्या ्वेळी झाली होती. दोघांनीही एकमेकांना एक वर्षभर डेट केलं. नुकत्याच फॅब्युल्स नावाच्या एका वेबसाईटशी बोलताना तिने आपल्या रिलेशनशिपबाबत अनेक खुलासे केले आहेत, असं आज तकच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

हे वाचा - फक्त एक Vitamin सुद्धा हिरावू शकतं आई-बाबा होण्याचं स्वप्नं; वेळीच ओळखा लक्षणं

ट्रेसीने सांगितले, तिने बॉयफ्रेंड बनवण्यासाठी एक अट ठेवली होती. आपला बॉयफ्रेंड हा Well-Endowed (ज्याचं लिंग मोठं आहे असा) पुरुष असावा अशी अट तिची होती. पुरुषात हवा असलेला हा गुण आणि तिची ही अटच मोठी अडचणीची ठरली.

तिने सांगितलं, "मला मार्कबाबत काहीच तक्रार नव्हती. आम्ही दोघंही खूप अॅडव्हेंचर करणारे लोक आहोत.  आमच्या वैयक्तिक आयुष्यात खूप अॅडव्हेंजर होते. आमची केमिस्ट्री इतकी हॉट होती की मला दोन-तीन वेळा रुग्णालयात जावं लागलं. अखेर एका वर्षानंतर आम्ही ब्रेकअप केला"

"मार्क मिस्टर युनिव्हर्सही बनला आहे. माझ्या आणि मार्कमध्ये असे बरेच किस्से आहेत जे मी सार्वजनिकरित्या नाही सांगू शकत. याशिवाय असे काही किस्से आहेत, ज्यावर फिल्म बनू शकते, असंही ती म्हणाली.  आई झाल्यानंतरही तुमचं आयुष्य थांबवत नाही याचा पुरावा म्हणजे माझं फिटनेस. यामुळेच माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले. वयच्या तिशीनंतर आयुष्य मंदावणाऱ्या लोकांपैकी मी नाही", असं तिचं म्हणणं आहे.

हे वाचा - OMG! केस आहेत की सोनं? रॉकस्टराच्या 6 केसांच्या लिलावाची किंमत वाचूनच येईल चक्कर

ट्रेसी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. तिचं यूट्युब चॅनेलही आहे. ज्या माध्यमातून ती आपली फिटनेस, सर्जरी आणि आपल्या आयुष्यासंंबंधी अपडेट्सच आपल्या चाहत्यांना देते. याशिवाय इन्स्टाग्राम, फेसबुक पेजही आहे.

First published:

Tags: Boyfriend, Girlfriend, Lifestyle, Relationship, Sex, Sexual relationship