मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आता आमनेसामने, भाजप-शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी; कोणाचा विजय होणार?

आता आमनेसामने, भाजप-शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी; कोणाचा विजय होणार?

गुलाबराव पाटील, एकनाथ खडसे

गुलाबराव पाटील, एकनाथ खडसे

सध्या जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक विविध कारणांमुळे चांगलीच गाजत आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  Ajay Deshpande

जळगाव, 28 नोव्हेंबर :  सध्या जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक विविध कारणांमुळे चांगलीच गाजत आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुलाबराव पाटील यांनी तर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आपला मुख्यमंत्र्यांसोबतचा गुवाहाटी दौरा देखील रद्द केला होता. तसेच एकनाथ खडसे यांनी लक्ष घालून दूध संघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल उभा करावा असे आवाहन देखील त्यांनी केले होते. मात्र आता महाविकास आघाडीने आपाल सहकार पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलच्या आशा मावळल्या आहेत.

सर्वपक्षीय पॅनल नाहीच  

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री सतीश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आम्ही आमचं पॅनल उतरवलं आहे. त्यामुळे आता निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलच्या आशा माळळल्याचं त्यांनी म्हटलं. पुढे बोलताना ते म्हणाले की,  महाविकास आघाडीचं सहकार पॅनल रिंगणात आहे. आता माघार घेणार नाही, आम्ही युद्धाची तयारी केली असल्याचं सतीश पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  कधी कधी वाटतं हे सर्व बघण्यापेक्षा मी मेलो...उदयनराजे सर्वांसमोर रडले!

भाजप, शिंदे गट विरूद्ध महाविकास आघाडी  

दरम्यान  कालपर्यंत आमची दिशाभूल केली, पण आता कोणाचाही फोन आला कुणाकडूनही निरोप आला तरीही सर्वपक्षीय पॅनलसाठी आम्ही तयार होणार नाहीत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत असं सतीश पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत भाजप, शिंदे गट विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची शक्याता आहे.

हेही वाचा :  बैठकीत पुढे जागा मिळावी यासाठी नाराजीनाट्य; भाजप आमदाराने केसरकरांकडे केली शिवसेना आमदाराची तक्रार

गुलाबराव पाटलांचा दौरा रद्द  

ही निवडणूक अनेक कारणांमुळे प्रतिष्ठेची बनली आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातलं आहे. गुलाबराव पाटील यांनी तर  जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आपला मुख्यमंत्र्यांसोबतचा गुवाहाटी दौरा देखील रद्द केला होता.

First published:

Tags: BJP, Eknath khadse, Election, Gulabrao patil, Jalgaon