जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'शिवाजी पार्क मैदान कोणाच्या...नाही'; दसरा मेळाव्यावरुन गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

'शिवाजी पार्क मैदान कोणाच्या...नाही'; दसरा मेळाव्यावरुन गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

'शिवाजी पार्क मैदान कोणाच्या...नाही'; दसरा मेळाव्यावरुन गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबईतील शिवाजी पार्कवर आपला दसरा मेळावा व्हावा यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत आहेत. यादरम्यान आता गुलाबराव पाटील यांनी यावरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

जळगाव 20 सप्टेंबर : शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्यापासून या दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच असते. आता दसरा मेळाव्यावरुन या दोन्ही गटात जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर आपला दसरा मेळावा व्हावा यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत आहेत. यादरम्यान आता गुलाबराव पाटील यांनी यावरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुंबईचं शिवाजी पार्क मैदान हे कोणा एकाच्या मालकीचं आहे असं नाही. महापालिका ज्याला देईल त्याला ते मिळणार असल्याचं सांगत गुलाबराव पाटील यांनी याबाबत अधिक बोलणं टाळलं आहे. आपल्या या प्रतिक्रियेनं त्यांनी उद्धव ठाकरेंना आठवण करून दिली आहे, की हे मैदान कोणा एका व्यक्तीच्या मालकीचं नाही. काँग्रेसमध्ये निवडणुकीचे वारे, शशी थरूरना कोण देणार आव्हान? दिल्लीत घडामोडींना वेग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 20 सप्टेंबर रोजीच्या जिल्हा दौऱ्याच्या नियोजनासाठी पाळधी येथील सुगोकी हॉटेलजवळच्या फार्म हाऊसमध्ये आयोजित मेळाव्यात गुलाबराव पाटील बोलत होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे समर्थकांचा पहिलाच मेळावा जळगावच्या मुक्ताईनगर येथे होणार असून जळगाव जिल्ह्यातील शिंदे समर्थक मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. तर याची जय्यत तयारी शिंदे समर्थक गटाकडून करण्यात आली असून ही सभा महाराष्ट्रातली शिंदे गटाची रेकॉर्ड ब्रेक सभा राहणार असल्याचा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर आपल्यावरती काहीजण टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला कामातून उत्तर देणार असल्याचं प्रतिपादनही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात