नितीन नंदुरकर जळगाव 30 सप्टेंबर : शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील अनेकदा आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. मात्र, आता कारण आहे बिग बॉसचं. बिग बॉसमध्ये जाणार का? यावर उत्तर देताना ते म्हणाले की बिग बॉसमध्ये जाण्याची सोन्यासारखी संधी मिळाल्यास नक्कीच जाणार.
‘एक नेता, एक झेंडा, एक मैदान…’; शिंदेंपाठोपाठ ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर समोर गुलाबराव पाटील म्हणाले, की बिग बॉसमध्ये जाण्याची सोन्यासारखी संधी मिळाली तर निश्चितपणे मी जाणार आहे. मागच्या काळात नाटकांमध्ये कायम भाग घ्यायचो. त्यामुळे बिग बॉसमध्ये बोलवल्यास नक्की जाऊ, असं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे. नुकतंच महेश मांजरेकरांना असा प्रश्न करण्यात आला होता, की राजकारणातील कोणकोणते चेहरे बिग बॉस मराठीच्या खेळात तुम्हाला पाहायला आवडतील. त्यावर उत्तर देताना मांजरेकर यांनी गुलाबराव पाटील यांचंही नाव घेतलं होतं. राजकीय वादात मुंबईकरांचे हाल? दसरा मेळाव्यादिवशी वाहतूक कोंडीची शक्यता, दोन्ही गटांकडून हजारो बस आरक्षित राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी बिग बॉसमध्ये यायला पाहिजेत, मजा येईल, ते कडक बोलतात, असं महेश मांजरेकर म्हणाले होते. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदार आणि फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील यांची विनोदबुद्धी चांगली आहे. तसंच भाजप आमदार नितेश राणेंना बघायला आवडेल, ते एक मजा वेगळी आणतील. तसंच शिवसेना खासदार संजय राऊतही आवडले असते. ते वेगळा रंग आणतात, असंही मांजरेकर म्हणाले होते.