नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 30 ऑक्टोबर : माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापले आहे. रवी राणा यांनी केलेल्या 50 खोक्यांच्या आरोपावरून कडू यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. आता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणांना सुनावत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या वादावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रवी राणा यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखं आहे. कोणी विकावू नाही. पण तुमच्या एका वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. म्हणून रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे, असे खडेबोल शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना सुनावत बच्चू कडू यांची बाजू घेतली. (टाटा यांना यासाठीच भेटला होता का? सामंत राजीनामा द्या, आदित्य ठाकरे कडाडले) ‘रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाही, तर ही गोष्ट चुकीची होईल आणि लोकांमध्ये सभ्रम निर्माण होईल. ४० वर्षांचं करिअर लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रवी राणा यांना आवर घालावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना करतो. तसंच दोघांनीही शांत बसवावं, हीच प्रार्थना असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. (‘कडू’ वाद होणार गोड, मुख्यमंत्री शिंदेंनी रवी राणांना वर्षा बंगल्यावर बोलावलं) ठाकरे गटासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढल्याने शिंदे सरकारवर टीका होत आहे. यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. सुरक्षा काढण्यावरून कुणी राजकारण करत नसतो. एखाद्या नेत्याची सुरक्षा काढल्याने कुणाला काही आनंद होत नसतो. सुरक्षे संदर्भात एक समिती काम करते, त्यानुसार तो निर्णय होतो. या समितीने घेतलेल्या आढावानुसारच सुरक्षा करण्यात येते. कोणत्याही नेत्याची सुरक्षा काढण्यामध्ये सरकारला स्वारस्य नाही, असं शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







