धक्कादायक! कोरोनाबाधित व्यक्तीच्या पार्थिवाची अवहेलना, लोकांनी अंत्यविधीच रोखला

धक्कादायक! कोरोनाबाधित व्यक्तीच्या पार्थिवाची अवहेलना, लोकांनी अंत्यविधीच रोखला

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवाची अवहेलना होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

बीड, 23 जुलै: राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. त्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवाची अवहेलना होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा अंत्यविधी गावकऱ्यांनी रोखल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे हा प्रकार गुरुवारी घडला.

हेही वाचा...पुणेकरांची सुटका नाहीच! कोरोनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश

मिळालेली माहिती अशी की, अंबेजोगाई येथील स्वराती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन व्यक्तीचा बुधवारी मृत्यू झाला. त्यांच्यावर अंबाजोगाई शहरातील बोरुळा तलाव स्मशानभूमीत संतप्त नागरिकांनी कोरोना बाधित व्यक्तीचा अंत्यविधी रोखला होता. कोरोना मृतांसाठी प्रशासनाने स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अंबाजोगाईत नागरी वस्तीत असलेली बोरूळ स्मशानभूमी सार्वजनिक असून शहरातील 70 टक्के अंत्यविधी या ठिकाणी होतात. दहाव्याचे कार्यक्रम देखील नियमित सुरु असतात. येथील तलावावर कपडे धुण्यासाठी आजूबाजच्या महिलांची सतत वर्दळ असते. तसेच, हे ठिकाण स्वराती रूग्णालयापासून 3 किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी मृतदेह आणण्यासाठी गावातून वर्दळीच्या रस्त्याने यावे लागते. त्यामुळे संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी या ठिकाणी कोरोना मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करू नयेत, अशी मागणी नागरिकांनी यापूर्वीच केली होती. धक्कादायक म्हणजे कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर 24 तास उलटले तर देखील अद्याप दोन्ही पार्थिवांवर अंत्यसंस्कार झाले नाहीत.

हेही वाचा...प्रकल्प अधिकाऱ्यानं अंगणवाडी महिलांच्या ग्रुपवर पोस्ट केला स्वतःचा न्यूड फोटो

दरम्यान, कोरोनाने मराठवाड्यात एकाच दिवशी 15 बळी घेतले आहेत, बीड, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, हिंगोलीत 7, जालना 100, बीड 26, उस्मानाबाद 20, परभणी 26 तर नांदेड जिल्ह्यात 32 कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

Published by: Sandip Parolekar
First published: July 23, 2020, 8:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading