आता या शहारात होणार नाही लॉकडाऊन, पालकमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

आता या शहारात होणार नाही लॉकडाऊन, पालकमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

नागपूर शहरासह जिल्ह्यात कोरोना व्हायरसमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • Share this:

नागपूर, 13 सप्टेंबर: नागपूर शहरासह जिल्ह्यात कोरोना व्हायरसमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री नितीन राऊत, व पोलीस आयुक्त यांच्या उपस्थित बैठक झाली. या बैठकीला सर्व विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूर शहरातील अनेक दुकानदार आमि ग्राहक सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत नाही आहेत. त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, पण लॉकडाऊन करण्यात येणार नाही, अशी माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

हेही वाचा...खासदार नवनीत राणा यांनी आता 'या' वादात घेतली उडी, साधला थेट मुख्यमंत्र्यावर निशाणा

पालकमंत्र्यांनी सांगितलं की, लॉकडाऊनला बरेच अधिकारी विरोध करत आहे. लॉकडॉऊनमुळे गरीब जनतेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याळे पुन्हा लॉकडाऊन नको, असं मत अधिकाऱ्यांनी मांडलं आहे. त्यामुळे शहरा आता लॉकडाऊन करण्यात येणार नाही, यावर एकमत झालं आहे. मात्र, शहरातील कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेड न मिळण्यासंदर्भात तक्रारी आहेत. मात्र, बेड शिल्लक आहे. मात्र, योग्य नियोजन नसल्यामुळे हा प्रकार समोर येत आहे. त्याबाबत लवकरच नियोजन करण्यात येणार आहे.

शहरात सध्या ऑक्सिजनची कमतरता नाही. मात्र, भविष्यात कमतरता निर्माण होईल त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. जम्बो हॉस्पिटल संदर्भात परवानगी घेतली आहे. मात्र, ते तयार करायला 2 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. म्हणून जी व्यवस्था आहे ती मजबूत केली जाईल, असं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

200 ऐवजी 500 रुपये दंड वसूल करा...

नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचं शहर आहे. तरी देखील नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे नागरिक ऐकत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. मात्र, नागपूरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा नाही, असं गृहमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

कोरोना काळात मास्क न वापणाऱ्यांबाबत गृहमंत्र्यांनी कठोर निर्णय घेतला आहे. नागपूरात मास्क न घालणाऱ्यांकडून 200 ऐवजी 500 रुपये दंड वसूल करा, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी उद्यापासून (14 सप्टेंबर) होणार आहे.

हेही वाचा...COVID-19: मित्रांसोबत केली बेधुंद पार्टी, 9 लाखांचा दंड होताच नशाच उतरली

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, नागपूर शहरातील अनेक दुकानदार आमि ग्राहक सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत नाही आहेत. मात्र, लॉकडाऊनला बरेच अधिकारी विरोध करत आहे. लॉकडॉऊनमुळे गरिब जनतेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याळे पुन्हा लॉकडाऊन नको, असं मत अधिकाऱ्यांनी मांडलं आहे. नागरिक मास्कचा वापर करीत नाही. नागरिक ऐकत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: September 13, 2020, 6:33 PM IST

ताज्या बातम्या