लॉकडाऊनमध्ये लागली लॉटरी! तब्बल 28 वर्षांनी मिळालं चोरी गेलेलं मंगळसूत्र

मुंबई लोकलमध्ये प्रवासादरम्यान तुमची वस्तू चोरीच गेली असेल, तर ती परत मिळण्याची अपेक्षा न केलेलीच बरी.

मुंबई लोकलमध्ये प्रवासादरम्यान तुमची वस्तू चोरीच गेली असेल, तर ती परत मिळण्याची अपेक्षा न केलेलीच बरी.

  • Share this:
    मुंबई, 29 ऑगस्ट: मुंबईसह उपनगरात चोरी गेलेली वस्तू परत मिळेलच, असं सांगता येत नाही. त्यातल्या त्यात लोकलमध्ये प्रवासादरम्यान तुमची एखादी वस्तू चोरीस गेली असेल, तर ती परत मिळण्याची अपेक्षा न केलेलीच बरी. मात्र, सध्याच्या लॉकडाऊनमध्ये एका महिलेची लॉटरी लागली आहे. लोकलमध्ये प्रवास करताना चोरीस गेलेलं मंगळसूत्र या महिलेला तब्बल 28 वर्षांनंतर मिळालं आहे. हेही वाचा....2 लाख रुपये द्या, उपोषण मागे घेतो, अन्यथा ॲट्रॉसिटी; आंदोलनकर्त्याची धमकी एरव्ही रेल्वे स्टेशनवर कर्तव्य बजावणारे राज्य राखीव पोलिस (जीआरपी) मोबाइल चोरी तसेच स्टेशनवर घडणाऱ्या घटनांमध्ये व्यस्त असतात. एखाद्या जुन्या प्रकरणाच्या तळाशी पोहोचण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. आता मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईत लोकलसेवा बंद आहे. सर्व स्टेशन निर्मनुष्य झाले आहेत. यामुळे जीआरपी सध्या जुन्या प्रकरणांच्या फाईल्स बंद करण्यात गुंतले आहेत. मंजुळा शाह नामक महिलेला तिचं चोरी गेलेलं मंगळसूत्र जीआरपीनं परत केलं. महिलेचं मंगळसूत्र तब्बल 28 वर्षांपूर्वी चोरीला गेलं होतं. विशेष म्हणजे, तक्रारदार महिलेलाचा पत्ता शोधण्यासाठी जीआरपीला तब्बल 4 वर्षे लागले. काय आहे प्रकरण? ही घटना 3 डिसेंबर, 1991 रोजीची आहे. चर्चगेटहून निघणाऱ्या लोकलच्या महिलांच्या डब्यातून मंजुळा शाह या प्रवास करत होत्या. गर्दीचा फायदा घेत कोणी त्यांचं मंगळसूत्र चोरलं. मंजुळा शाह यांनी मुंबई सेंट्रल जीआरपी पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. आपलं मंगळसूत्र परत मिळेल, अशी आशा मंजुळा शाह यांनी तेव्हाच सोडून दिली होती. हेही वाचा...धडक बसताच 4 ठार 2 जखमी.. PHOTO मधून पाहा अपघाताची भीषणता दरम्यान, जीआरपीने 16 डिसेंबर, 1991 रोजी फातिमा नामक एका महिलेला चोरी प्रकरणी अटक केली होती. तिच्याकडून एक मंगळसूत्र पोलिसांनी जप्त केलं होतं. 1991 मध्ये मोबाइल किंवा संपर्क करण्याच साधन नव्हतं. तसेच मजुंळा शाह यांनी देखील फॉलोअप घेतला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेला ऐवज आपल्या कस्टडीत ठेवला होती. दरम्यान जीआरपीने मंजुळा शाह यांचा घराचा पत्ता शोधून काढून त्यांनी त्यांचं चोरीला गेलेलं मंगळसूत्र परत केलं. आता मंजुळा शाह यांचं वय 80 वर्षे आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published: