मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

2 लाख रुपये द्या, उपोषण मागे घेतो...अन्यथा ॲट्रॉसिटी; पुण्यात आंदोलनकर्त्याची धमकी

2 लाख रुपये द्या, उपोषण मागे घेतो...अन्यथा ॲट्रॉसिटी; पुण्यात आंदोलनकर्त्याची धमकी

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत मेन बाजार येथे राहत्या घरांवर 17 व्यापाऱ्यांकडून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत मेन बाजार येथे राहत्या घरांवर 17 व्यापाऱ्यांकडून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत मेन बाजार येथे राहत्या घरांवर 17 व्यापाऱ्यांकडून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे

आनिस शेख, (प्रतिनिधी) मावळ, 29 ऑगस्ट: दोन लाख रुपये द्या, मी उपोषण मागे घेतो. अन्यथा तुमच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देणाऱ्या एका आंदोलकाविरुद्ध देहूरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात करण्यात आला आहे. अमित माणिक छाजेड असं आरोपीचं नाव आहे. हेही वाचा...धडक बसताच 4 ठार 2 जखमी.. PHOTO मधून पाहा अपघाताची भीषणता देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत मेन बाजार येथे राहत्या घरांवर 17 व्यापाऱ्यांकडून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्यासंदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डानं या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी व्यापाऱ्यांना नोटीस बजावली आहे. सदर बांधकामावर तात्काळ कारवाई करावी, यासाठी अमित माणिक छाजेड याने बंडाचा पवित्रा उगारत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विरोधात उपोषणास सुरुवात केली. अमित माणिक छाजेड यानं आपल्या कार्यकर्त्यासोबत आंदोलन तसेच उपोषणाला सुरुवात केली. परंतु उपोषणादरम्यान व्यापाऱ्यांसोबत काही तडजोड होते का, या विचारात तो होता. छाजेड याने देहूरोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनय बरोटा यांना फोन करून 17 व्यापाऱ्यांनी मिळून मला दोन लाख रुपये द्या. मी माझे आंदोलन उपोषण स्थगित करतो. अन्यथा माझ्या आंदोलनामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डकडून होणाऱ्या अतिक्रमण कारवाईला सामोरे जा. तसेच मागणी पूर्ण झाली नाही तर व्यापाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हे दाखल करतो, अशी धमकी दिली. हेही वाचा... जात-धर्म-पंथाच्या पलीकडे जाऊन ही मुस्लिम फॅमिली मनोभावे करते बाप्पाची सेवा यासंदर्भात विनय बरोटा यांनी अमित यांचे संभाषण मोबाईलवर रेकॉर्ड करून इतर व्यापाऱ्यांसोबत थेट पोलिस स्टेशन गाठलं. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अमित माणिक छाजेड याच्याविरुद्ध भादंवि कलम 385 अंतर्गत खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. या संपूर्ण प्रकरणात अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून देहूरोड पोलीस घटनेचा तपास करीत आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Pune crime, Pune police

पुढील बातम्या