मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'ती' ड्रग पार्टी नव्हतीच! करण जोहरच्या पार्टीत आलेल्या कलाकारांना NCBचा मोठा दिलासा

'ती' ड्रग पार्टी नव्हतीच! करण जोहरच्या पार्टीत आलेल्या कलाकारांना NCBचा मोठा दिलासा

2019 मध्ये दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) एका पार्टीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावेळी देखील हा व्हिडीओ 'बॉलिवूडमध्ये ड्रग्ज घेतले जात असल्याच्या' आरोपामुळे खूप चर्चेत आला होता. सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग कनेक्शनमध्ये देखील या व्हिडीओची चर्चा झाली

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 27 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death) समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये (Drug Case) बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे नाव समोर आले होते. याप्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone), रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) या अभिनेत्रींची  चौकशी करण्यात आली. त्याचप्रमाणे निर्माता दिग्दर्शक करण जोहर  (Karan Johar) देखील एका व्हिडीओमुळे अडचणीत आला होता. 2019 मधील हा व्हिडीओ होता. त्याच्या एका पार्टीतील व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान या प्रकरणी आता करण जोहर आणि या पार्टीमध्ये उपस्थित असणार बॉलिवूड कलाकार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्टीत ड्रग घेतेले गेल्याचा आरोप करण्यात आला होता. आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या व्हिडीओला क्लीन चीट दिली आहे. झी न्यूजने दिलेल्या एका वृत्तानुसार एनसीबीने या व्हिडीओला क्लीन चीट दिली आहे. यामध्ये असे देखील समोर आले आहे की, जी सफेद रेष या व्हिडीओमध्ये दिसत आहे ती अंमली पदार्थाची नसून व्हिडीओतील प्रकाशाचे प्रतिबिंब आहे. (हे वाचा-व्हायरल होत आहेत सुहाना खानचे हे PHOTOS, बोल्ड अदांची तुफान चर्चा) 2019 मध्ये करण जोहरने एका पार्टीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावेळी देखील हा व्हिडीओ खूप चर्चेत आला होता. त्याच्या राहत्या ठिकाणी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या व्हिडीओत दीपिका पादुकोण, शाहिद कपूर, वरुण धवन, मलायका अरोरा, अर्जून कपूर, विकी कौशल, रणबीर कपूर, झोया अख्तर, अयान मुखर्जी, मीरा राजपूत, शकुन बात्रा आणि इतर काही कलाकार दिसत होते. दरम्यान त्यावेळी देखील हे कलाकार पार्टीत ड्रग घेत असल्याचे वेगाने पसरले होते. हा आहे तो व्हायरल झालेला व्हिडीओ-
View this post on Instagram

Saturday night vibes

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

याविषयी निर्माता करण जोहर याने देखील या पार्टीसंदर्भात एक अधिकृत स्टेटमेंट त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्याने असे म्हटले होते की, 'मीडियामध्ये अशी चुकीची बातमी पसरवली जात आहे की, 28 जुलै रोजी मी होस्ट केलेल्या पार्टीमध्ये ड्रग्ज वापरण्यात आले. 2019 मध्ये देखील मी हे स्पष्ट केले होते की सर्व आरोप खोटे आहेत. पार्टीमध्ये कोणत्याही प्रकारे ड्रग वापरण्यात आले नव्हते.'
View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

त्याचप्रमाणे अभिनेता विकी कौशल याने देखील अशा प्रकारे कोणतेच अंमली पदार्थाचे सेवन त्या पार्टीत झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याने एका जाहीर कार्यक्रमात याविषयी प्रतिक्रिया दिली होती. विकीने असे म्हटले होते, पार्टीच्या दुसऱ्या दिवशी तो अरुणाचल प्रदेशमध्ये गेला होता आणि 4 दिवस त्याने इंटरनेट सुरू केले नव्हते. जेव्हा तो परतला तेव्हा व्हायरल झालेल्या गोष्टी धक्कादायक होत्या. त्याने यावेळी करण जोहरला पाठिंबा देत असेही म्हटले होते की, जर तिथे सर्वजण ड्रग घेत होते तर असा व्हिडीओ करण का अपलोड करेल?
First published:

Tags: Bollywood, Karan Johar, Sushant Singh Rajput

पुढील बातम्या