मुंबई, 27 एप्रिल : दुबईत राहणाऱ्या एका 4 वर्षाच्या भारतीय चिमुरडीची रोगप्रतिकार शक्ती कमी होती. अशाही परिस्थितीत ती कोरोनाला (Coronavirus) हरविण्यात यशस्वी ठरली आहे. कोरोना (Covid -19) या आजाराबाबत लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. योग्य उपचार आणि नियमांचे पालन केलं तर कोरोनाची लागण होणार नाही आणि झालीच तरी त्यातूनही सुखरुप बाहेर निघू शकतो. यासाठी संयम व विश्वास हवा. या 4 वर्षांच्या मुलीने प्रतिकूल परिस्थितीत कोरोनासारख्या आजाराला हरवलं. ही समाधानकारक बाब आहे. सिवानी असं या मुलीचं नाव आहे. तिने कॅन्सरलाही (Cancer) मात दिली आहे. सिवानीची आई आरोग्य अधिकारी आहे. त्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करतात. त्यांच्यामार्फत सिवानीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून ती Al Futtaim Health Hub येथे उपचार घेत होती. सिवानी व तिचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आले होते. मात्र त्यांच्यामध्ये कोणतीच लक्षणं दिसून येत नव्हती. गेल्या वर्षी सिवानीला किडनी कॅन्सर झाला होता. ती त्यातून बाहेर येते न तोच तिला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे सिवानीची अधिक काळजी घेतली जात होती. गेल्या वर्षी तिची केमोथेरेपी सुरू असल्याचे तिच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम झाल्याची माहिती डॉ. थोलफकर अल बाज यांनी दिली. तिच्यामध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक जलद गतीने होण्याची शक्यता असल्याने तिच्याकडे लक्ष दिलं जात होतं. 20 दिवसांच्या लढ्यानंतर सिवानीने कोरोनालाही हरवलं व सुखरुप घरी पोहोचली आहे. संबंधित - माऊलीने केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक; म्हणाला, उद्धव ठाकरे लय भारी! लॉकडाऊनमध्ये पती-पत्नीमध्ये रंगला लुडोचा डाव, जिंकणारा थेट रुग्णालयात दाखल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.