मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /देश आणखी मोठ्या संकटात सापडणार! भेंडवळ घटमांडणीत वर्तवलं धक्कादायक भाकीत

देश आणखी मोठ्या संकटात सापडणार! भेंडवळ घटमांडणीत वर्तवलं धक्कादायक भाकीत

देशाचा राजा (पंतप्रधान नरेंद्र मोदी) कायम राहील. मात्र त्याच्यावर प्रचंड ताण असेल... वाचा भविष्यवाणी

देशाचा राजा (पंतप्रधान नरेंद्र मोदी) कायम राहील. मात्र त्याच्यावर प्रचंड ताण असेल... वाचा भविष्यवाणी

देशाचा राजा (पंतप्रधान नरेंद्र मोदी) कायम राहील. मात्र त्याच्यावर प्रचंड ताण असेल... वाचा भविष्यवाणी

बुलडाणा, 27 एप्रिल: देश आणखी मोठ्या नैसर्गिक आपत्तीत सापडणार आहे. देशावर आर्थिक संकट कोसळेल व देश आर्थिक संकटात जाईल.सर्वांनी संघटित होऊन देशावर येणार्‍या संकटाशी लढा करावा लागेल, असे धक्कादायक भाकीत भेंडवळ घटमांडणीत करण्यात आलं आहे. देशाचा राजा (पंतप्रधान नरेंद्र मोदी) कायम राहील. मात्र त्याच्यावर प्रचंड ताण असेल, असेही यात म्हटलं आहे.

देशवर असलेलं कोरोना विषाणूचं सावट भेंडवळ घटमांडणीत सुद्धा दिसून आलं. यंदा केवळ 4 जणांच्या उपस्थितीत भेंडवळ घटमांडणी करण्यात आली. मोजक्या लोकांत भविष्यवाणी जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी देश मोठ्या नैसर्गिक आपत्तीत सापडणार आहे. भरपूर पाऊस होणार आहे. पीक परिस्थिती साधारण राहील तर अतिवृष्टी होईल. देशाचा राजा कायम राहील मात्र त्याच्यावर प्रचंड ताण असेल. संरक्षण व्यवस्था मजबूत असली तरी शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. त्यामुळे सर्वांनी संघटित होऊन देशावर येणार्‍या संकटासी लढा करावा लागेल, असे भाकीत भेंडवळ घटमांडणी केले आहे.

हेही वाचा...माऊलीने केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक; म्हणाला, उद्धव ठाकरे लय भारी!

काय आहे भेंडवळ घटमांडणी...?

सुप्रसिद्ध भेंडवळ घटमांडणी केवळ चार लोकांच्या उपस्थितीत करण्यात आली. या घटमांडणीचे भाकीत अखेर आज दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी वर्तवलं. घटामध्ये ठेवलेल्या करव्यावरील पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी पूर्णतः गायब होती. त्यामुळे संपूर्ण विश्वात नैसर्गिक संकटे येतील. कुठे कृत्रिम आपत्ती येईल. परकीय शत्रूपासून घुसखोरी आतंकवादी कारवाया सुरू राहतील. कोरोनासारख्या साथीचे आजार पसरून जग त्रस्त होईल. प्रचंड अतिवृष्टी होईल, अनेक ठिकाणी महापूर येतील. भूकंप त्सुनामी सारखी संकट देशावर येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

एकंदर पाणी, पाऊस आणि पिके वगळता इतर संकटांची या वर्षात मोठी सरबत्ती होणार आहे. त्यामुळे जनजीवन संकटात येईल. त्यासाठी सर्वांनी संघटितपणे राहून संकटावर मात करण्याची गरज निर्माण होणार आहे, असे धक्कादायक भाकीत यंदाच्या भेंडवळच्या घटमांडणीतून बाहेर आले आहे.

हेही वाचा......पण भारतावरचे संकट टळलेले नाही, PM मोदींच्या व्हिडीओ कॉन्फरन्सची INSIDE STORY

असं वर्तवलं भाकीत..

पाऊस - यावर्षी पाऊस चांगला राहील. जूनमध्ये साधारण, जुलैमध्ये चांगला, ऑगस्टमध्ये कमी, सप्टेंबरमध्ये अधिक चांगला. तसेच अवकाळी पाऊसही पडेल.

नैसर्गिक आपत्ती: काही भागात पूर परिस्थिती निर्माण होईल. देशात रोगराई पसरेल.

राजकीय स्थिती: राजा कायम आहे. म्हणजेच पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी कायम राहातील. मात्र, देशातील समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यावर मोठा ताण येईल.

संरक्षण संकट: घुसखोरी वाढेल, संरक्षण व्यवस्थेवर ताण येईल, परंतु ती मजबूत राहील.

आर्थिक स्थिती- देशावर आर्थिक संकट कोसळेल व देश आर्थिक संकटात जाईल.

पीक: कापसाचे पीक साधारण राहील. ज्वारी ठीक. पाऊसामुळे नासाडी होईल. उडीद, मुग नासाडी होईल. तुरीचे पीक चांगले होईल. रब्बी पिके गहू हरभरा चांगले होतील. करडी पीक चांगले होईल.

संपादन- संदीप पारोळेकर

First published:
top videos

    Tags: PM narendra modi