मुंबई, 28 जुलै: शासकीय कर्माचाऱ्यांना दिलासादायक बातमी आहे. ती, म्हणजे कोरोनामुळे मार्च महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्यात आलेली रक्कम त्यांना लवकरच मिळणार आहे. याबाबत राज्य सरकारनं आदेश संबंधित विभागांना आदेश जारी केले आहेत. ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पगारात कपात करण्यात आलेली रक्कम द्यावी, असं आदेशात म्हटलं आहे. हेही वाचा… कोरोनाची दहशत असताना कोकणात अज्ञात आजाराचं थैमान, गुहागरमध्ये 19 जणांचा मृत्यू दरम्यान, कोरोना व्हायरसनं राज्यात थैमान घातलं आहे. लॉकडाऊनमुळे राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला आहे. कोरोना संकाटमुळे आर्थिक स्थिती बिकट झाली होती. त्यावेळेस राज्य सरकारी कर्मचारी पगार कपात केली होती. आता कपात केलेला पगार ऑगस्ट महिन्यांत देण्याचे आदेश काढले आहेत. मार्च महिन्यात लोकप्रतिनिधी 60 टक्के, गट अ, ब वर्ग कर्मचारी यांचे 50 टक्के, तर क वर्ग 25 टक्के पगार कपात करण्यात आली होती. दुसरीकडे वित्त विभागाने मंत्री, अधिकारी यांच्या गाडी खरेदीवर मर्यादा आणली आहे. कमी किमतीत गाडी खरेदी करण्याचे आदेश काढले आहेत. पूर्वी 22 लाख रुपये वाहन खरेदीसाठी देण्यात येत होते. आता केवळ 20 लाख रुपयांत गाडी खरेदी करावी लागणार आहे. त्याचबरोबर गाडी खरेदीसाठी कुठल्याही किंमत वाढवून दिली जाणार नाही, याबाबत स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. यापूर्वी गाडीची किंमत वाढवून देण्याची मागणी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती, त्यावर मोठं राजकीय झालं होतं. हेही वाचा… माणुसकी हरपली! कोरोनामुळे मृत बिल्डरच्या बॅंक खात्यावरच कर्मचाऱ्याचा डल्ला? मार्चपासून राज्य सरकारला 60 हजार कोटींचे नुकसान झालं होतं. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळं जीएसटी, विक्रीकर, उत्पादन शुल्क, मुद्रांक शुल्क यातून येणारे उत्पन्न थांबले आहे. त्यामुळं याआधी राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या वेतन कपात करण्याचाही निर्णय घेतला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.