माणुसकी हरपली! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बिल्डरच्या बॅंक अकांऊटवरच कर्मचाऱ्याचा डल्ला?

माणुसकी हरपली! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बिल्डरच्या बॅंक अकांऊटवरच कर्मचाऱ्याचा डल्ला?

समाजातील काही व्यक्तींच्या संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत की, ते आता मृतांना देखील सोडताना दिसत नाही आहे.

  • Share this:

मुंबई, 28 जुलै: समाजातील काही व्यक्तींच्या संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत की, ते आता मृतांना देखील सोडताना दिसत नाही आहे. अशी एक धक्कादायक घटना मुंबईत समोर आली आहे. कांदिवली क्राइम ब्रॅचने एका रॅकेट भंडाफोड केला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बिल्डरचं बँक अकाऊंटमधून मोठी रक्कम ट्रान्सफर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या रॅकेटमध्ये बिल्डरच्याच कर्मचाऱ्यांचा हात असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा... पुण्यात घडली देशातील पहिली दुर्मिळ घटना, डॉक्टरही झाले हैराण

डीसीपी अकबर पठान यांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. शफीक शेख, प्रीतेश मांडलिया, अर्शद सैयद आणि स्वप्निल ओगेलेकर अशी आरोपींची नाव आहेत.

आरोपी शफीक हा एका बिल्डरकडे नोकरी करत होता. मात्र, काही दिवसांपूर्वी 81 वर्षीय बिल्डरचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. याचा फायदा शफीकने घेतला. शफीकला माहीत होतं की, बिल्डरने कोणते दस्ताऐवज कुठे ठेवले आहे. एवढंच नाही तर बिल्डरच्या कोणत्या बँक अकाऊंटवर किती रक्कम आहे, याबाबतही शफीकला माहीत होतं.

कामाचा बहाणा करून शफीक बिल्डच्या ऑफिसमध्ये गेला. त्यानं बिल्डरचे चेक बूक चोरले. चेक बूकमधील काही चेकवर बिल्डरची स्वाक्षरी होती. शफीक यानं ऑफिसमधून मृत बिल्डरचं आधार कार्ड देखील घेतलं. आधार कार्डची झेरॉक्स कॉपी काढून त्यावर त्याच्या एका साथिदाराचा फोटो लावला. नंतर पुन्हा एक झेरॉक्स कॉपी काढली. बिल्डरच्या अकाऊंटवरून रक्कम ट्रान्सफर करताना ओटीपी आपल्या माहीत पडावा म्हणून शफीक यानं मोबाइल गॅलरीमध्ये जाऊन बिल्डरच्या नावाचं सिम कार्ड खरेदी केलं.

हेही वाचा...खड्ड्यात अडकला 7 वर्षांचा मुलगा, जमिनीतून बाहेर आला फक्त एक हात! पाहा VIDEO

मात्र, शफीक आणि त्याच्या साथिदारांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सगळ्यांना कांदिवली क्राइम ब्रॅंचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव व शरद झीने यांच्या पथकानं अटक केली. आरोपींना किल्ला कोर्टात हजर केले असता 31 जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 28, 2020, 12:57 PM IST

ताज्या बातम्या