मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Goa Politics : काँग्रेस सोडलेले गोव्याचे 7 आमदार अमित शहांच्या भेटीला, मोठ गिफ्ट मिळणार?

Goa Politics : काँग्रेस सोडलेले गोव्याचे 7 आमदार अमित शहांच्या भेटीला, मोठ गिफ्ट मिळणार?

महाराष्ट्रातील आमदारांच्या बंडखोरीनंतर आता गोव्यात आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. (Goa Politics)

महाराष्ट्रातील आमदारांच्या बंडखोरीनंतर आता गोव्यात आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. (Goa Politics)

महाराष्ट्रातील आमदारांच्या बंडखोरीनंतर आता गोव्यात आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. (Goa Politics)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Panaji (Panjim, India

पणजी, 20 सप्टेंबर : महाराष्ट्रातील आमदारांच्या बंडखोरीनंतर आता गोव्यात आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. (Goa Politics) दरम्यान यापाठीमागे वरदहस्त असलेल्या अमित शहा यांची 8 पैकी 7 आमदारांनी भेट घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे हेही हजर होते. या आमदारांनी भेट घेतल्याची माहिती ट्वीटरवरून देण्यात आली. काल (दि.19) रोजी त्यांनी भेट घेतली.

मागच्या 8 दिवसांपूर्वी गोवा काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला मोठा धक्का दिला. भारत जोडोच्या माध्यमातून राहूल गांधी देशातील विस्कळीत झालेल्या काँग्रेसल एकत्र करण्याचा प्रयत्न करत असतानाच गोव्याचे आठ आमदार फुटल्याने काँग्रेसला जबर धक्का बसला होता. भाजपवासी झालेल्या दिगंबर कामत, मायकल लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस तसेच आलेक्स सिक्वेरा या सात आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली.

हे ही वाचा : काँग्रेस नेत्यांची 'दांडी'ची सवय सुटेना, विश्वासदर्शक ठरावानंतर पक्ष बैठकीलाही गैरहजर!

वरिष्ठ नेत्यांच्या भेटीवेळी मायकल लोबो हे मात्र काही कारणांमुळे उपस्थित नव्हते. राज्यात चांगले प्रशासन देणे आणि लोकांच्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या मुद्द्यावर वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याचे तानवडे यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. सोमवारी रात्रीच सात आमदार गोव्याला परतल्याचे समजते.

काँग्रेसचा पलटवार

काँग्रेसच्या आठ आमदारांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी 30 ते 40 कोटी घेतल्याचा आरोप काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव यांनी केला आहे, तो वैफल्यग्रस्तेतून केलेला आहे. या आरोपात कोणतेही तथ्य नाही. जर आपण एक पैसा जरी प्रवेशासाठी घेतला आहे हे दिनेश सिद्ध करत असतील तर आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे.

हे ही वाचा : भाजपच्या 'मिशन 45' ची Inside Story, अशी आखलीये महाराष्ट्राची रणनिती!

उलट राव यांनीच 12 उमेदवारांकडून उमेदवारीसाठी कोट्यवधी रुपये घेतले, असा आरोप मुरगावचे भाजप आमदार संकल्प आमोणकर यांनी केला आहे. दिनेश राव यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपने काँग्रेसच्या आठ आमदारांना प्रत्येकी 30 ते 40 कोटी देऊन विकत घेतल्याचा आरोप केला होता, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी (दि. 16) रोजी आमोणकर यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रदेश सरचिटणीस माजी आमदार दामोदर नाईक उपस्थित होते.

First published:
top videos

    Tags: Amit Shah, BJP, Goa, Goa Election 2021, South Goa