मुंबई, 19 सप्टेंबर : सध्या भाजपची संपूर्ण देशभर 2024 च्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. वेगवेगळ्या स्तरावर मतदारसंघनीय मिशन भाजपची रणनीती ठरली आहे, याच पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रात मिशन 45 सुरू केले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा असो किंवा भूपेंद्र यादव यांचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा असो, हे भाजपच्या मिशन 45 अंतर्गत सुरू असलेल्या प्रक्रियेचा भाग आहे. भारतीय जनता पक्षाला 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ता मिळवायची आहे, त्यासाठी त्यांनी 2019च्या लोकसभेत पराभूत झालेल्या मात्र दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांच्या 144 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यापैकी महाराष्ट्रातले 16 लोकसभा मतदारसंघ असून या सर्वांना पकडून भाजपला राज्यात 2024 मध्ये राज्यात 48 पैकी 45 लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत, आणि हेच भाजपचं मिशन 45 आहे.
2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जेव्हा भाजपने देशात सत्ता मिळाली होती तेव्हा भाजपला महाराष्ट्रातून 42 खासदारांचे समर्थन होते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेले ताटातूट आणि मागच्या तीन वर्षात राज्यात घडलेले राजकीय महाभारत या पार्श्वभूमीवर भाजपचे मिशन 45 भाजप साठी वाटते तितके सोपे नाही. दुसरीकडे विरोधक देखील आक्रमक असून महागाई, बेरोजगारी आणि केंद्रीय संस्थांचा होणारा वापर, हे मुद्दे घेऊन भाजपच्या मिशन 45 ला सुरूंग लावायच्या तयारीत दिसत आहेत.
नितीश कुमार यांनी बिहारमधून भाजपसोबत घेतलेली फारकत, उत्तर प्रदेशमध्ये हिंदी कार्डचा दिसणारा धोका, त्यामुळे सध्या महाराष्ट्र हे असे राज्य आहे जिथे भाजपला 2019 च्या तुलनेने नुकसान भरपाईचा धोका तर आहे मात्र नुकसान भरपाई कमी करून आपली संख्या वाढवण्याची संधी देखील भाजपसाठी महाराष्ट्रातच दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP