मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Goa Election Results 2022: गोव्यात भाजप-काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर', आमदार फुटू नये म्हणून काँग्रेसची फिल्डिंग, घेतला मोठा निर्णय

Goa Election Results 2022: गोव्यात भाजप-काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर', आमदार फुटू नये म्हणून काँग्रेसची फिल्डिंग, घेतला मोठा निर्णय

Goa Election Results 2022 live updates: गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांचे आमदार आघाडीवर आहेत. त्यामुळे येथे दोन्ही पक्षांत काँटे की टक्कर पहायला मिळत आहे.

Goa Election Results 2022 live updates: गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांचे आमदार आघाडीवर आहेत. त्यामुळे येथे दोन्ही पक्षांत काँटे की टक्कर पहायला मिळत आहे.

Goa Election Results 2022 live updates: गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांचे आमदार आघाडीवर आहेत. त्यामुळे येथे दोन्ही पक्षांत काँटे की टक्कर पहायला मिळत आहे.

पणजी, 10 मार्च : गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल (Goa Assembly Election result 2022) समोर येऊ लागले आहेत. एकूण 40 जागांपैकी ज्या जागांचे कल हाती येत आहे त्यानुसार भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जवळपास समसमान जागांवर आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस (BJP and Congress)  या दोन्ही पक्षांकडून इतर पक्षांच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आपले आमदार फुटू नयेत यासाठी काँग्रेस पक्षाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या मात्र असे असतानाही भाजपने आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्ष सम-समान जागांवर आघाडी मिळवताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून काँग्रेस पक्षाने आपले आमदार इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसची महाराष्ट्रात फिल्डिंग

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाने आपले आमदार महाराष्ट्रात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात लोणावळा  येथे काँग्रेस आपल्या गोव्यातील सर्व नवनिर्वाचित आमदारांना हलवणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने हे स्थळ सुरक्षित मानले जात आहे आणि त्यामुळेच काँग्रेस पक्षाने आपले आमदार महाराष्ट्रात हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

Election Results 2022 Live Updates: कोणाच्या डोक्यावर सजणार विजयाचा मुकूट?, पहा मतमोजणीचे प्रत्येक अपडेट्स

गोव्यात पोस्टल बॅलटनंतर काय स्थिती?

पोस्टल बॅलटनंतर भाजप - 14 जागांवर आघाडीवर आहे

काँग्रेस - 17 जागांवर आघाडीवर

MGP 4 जागांवर आघाडीवर

तर अपक्ष एका जागेवर आघाडीवर

मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना धक्का

आता एक मोठी बातमी गोव्यातून समोर आली आहे (Goa Election Result Updates). गोव्यातील सांकेलीम मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. कारण या मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांच्यात चुरशीची लढत आहे. अशात आता या मतदारसंघात प्रमोद सावंत (Pramod Sawant trailing) सध्या पिछाडीवर असल्याचं समोर आलं आहे. सांकेलीम मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी 436 मतांनी आघाडीवर आहेत

40 जागा असलेल्या गोव्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे; मात्र आप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमजीपी आदी पक्षांनी यावेळी जोर लावल्यामुळे सर्वांचं लक्ष निकालाकडे आहे. गेल्यावेळी काँग्रेसने गोव्यात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या; मात्र तरीही सरकार स्थापन करण्यात भाजपला यश मिळालं होतं.

First published:
top videos

    Tags: Assembly Election, BJP, Goa, Goa Election 2021, काँग्रेस