झेंडा भल्या कामाचा तो घेऊन निघाला...! QR कोडनंतर डिसले गुरूजी करतायंत हे मोठं काम

झेंडा भल्या कामाचा तो घेऊन निघाला...! QR कोडनंतर डिसले गुरूजी करतायंत हे मोठं काम

डिसेंबर 2020 मध्ये प्रतिष्ठित ग्लोबर शिक्षक पुरस्कार जिंकल्यानंतर रणजितसिंह डिसले गुरुजी चर्चेमध्ये आले. डिसले गुरुजींनी लोकसेवेचा हा वसा असाच सुरू ठेवला आहे

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी: देशभरामध्ये 72वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त नेटवर्क18 च्या पुढाकाराने ‘मिशन पानी’ (Mission Paani) हा कार्यक्रम पार पडला. जल संवर्धनाची शपथ घेण्यासाठी वॉटर वॉरियर्स, राजकारणी, केंद्रीय मंत्री आणि सेलिब्रिटींसह अनेक जण नेटवर्क18 च्या मंचावर एकत्र आले होते.महाराष्ट्रातील शालेय शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी देखील यावेळी जलसंवर्धनासाठी शपथ घेतली. ग्लोबल शिक्षक पुरस्कार जिंकल्यानंतर रणजितसिंह डिसले गुरुजी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांना 7 कोटी रुपयांचे बक्षीसही मिळाले होते.

डिसेंबर 2020 मध्ये प्रतिष्ठित ग्लोबर शिक्षक पुरस्कार जिंकल्यानंतर रणजितसिंह डिसले गुरुजी चर्चेमध्ये आले. त्यांनी न्यूज18 आणि हार्पिक इंडियाद्वारे सुरु करण्यात आलेल्या ‘मिशन पानी’वॉटरथॉन उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमाचा हेतू जलसंवर्धनाविषयी चर्चा करणे तसंच, वॉटर वॉरियर्स आणि रणजितसिंह डिसले यांच्यासारख्या पर्यावरणवाद्यांचा सन्मान करणं हा होता.

रणजितसिंह डिसले यांच्या चाहत्यांना ते एक शिक्षक असल्याचे माहिती आहे. पण त्याचबरोबर ते पर्यावरणवादीही आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या परितेवाडीचे रहिवासी असलेले रणजितसिंह डिसले यांनी गेल्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पाण्याचे संवर्धन करण्यासाठी (water conservation) आपल्या गावातील विद्यार्थ्यांना पाणी साठवण्याच्या (water harvesting) तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले.

(हे वाचा-तरुणांसाठी खूशखबर! 2021 मध्ये नोकरीच्या संधी, या कंपन्यांमध्ये होणार मोठी भरती)

न्यूज18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, 'लॉकडाउनच्या काळात आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याकडून घरात किती पाणी आणि वीज वापरली जाते याकडे लक्ष ठेवण्यासाठी एक ऑब्झर्वेशन सीट (observation seat) सुरु केले.या आकडेवारीच्या आधारे विद्यार्थ्यांनी गावात उपलब्ध असलेल्या पाण्याचा किती काळ वापर करता येईल हे समजून घेण्यासाठी कृती आराखडा तयार केला.' तसंच, पावसाची कमतरता भासल्यास विद्यार्थ्यांनी प्लॅन बी देखील तयार केला.विद्यार्थ्यांनी आता पाण्याचा योग्य वापर करण्यास सुरुवात केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि शालेय अभ्यासात पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोड (QR Code) आणून क्रांती घडवल्यामुळे रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जिंकणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. 'शिक्षक हे जगातील रिअल चेंजमेकर्स आहेत', असा विश्वास रणजितसिंह डिसले यांनी व्यक्त केला. डिसले यांनी त्यांना मिळालेल्या 7 कोटीं रुपयांमधील निम्मी रक्कम या पुरस्कासाठी अंतिम यादीच पोहचलेल्या इतर १० शिक्षकांना वाटली होती.

(हे वाचा-या महिलेनं 20 वर्ष करत असलेली नोकरी सोडत सुरू केला बिझनेस, आज आहे करोडपती)

बुधवारी रणजितसिंह डिसले, परिवर्तन घडवणारे वॉटर वॉरियर आमला रुईया आणि डॉ. फौजिया तरन्नुम, बाल पर्यावरणवादी लिसिप्रिया कांजुगाम आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यासारख्या अनेकांनी एकत्र येत जलसंवर्धनासाठी पाठिंबा दिला. हवामान बदल आणि पाण्यासारख्या संसाधनांची बचत करण्यासाठी तरुण महत्वाचे आहेत.डिसले गुरुजींसारखे शिक्षक पुढाकार घेऊन हा संदेश तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

(सीएनएन न्यूज18 आणि हार्पिक इंडिया यांच्या पुढाकाराने भारतातील मौल्यवान जलसंपत्ती वाचवण्यासाठी आणि स्वच्छतेला जीवनशैली बनवण्यासाठी मिशन पानी ही मोहीम राबवली जात आहे. तुम्ही जल प्रतिज्ञा घेऊन या कार्यामध्ये आपले योगदान देऊ शकता.याठिकाणी भेट द्या- www.news18.com/mission-paani)

Published by: Aditya Thube
First published: January 27, 2021, 12:52 PM IST

ताज्या बातम्या