मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Inspiring Story: या महिलेनं 20 वर्ष करत असलेली नोकरी सोडत सुरू केला बिझनेस, आज आहे करोडपती

Inspiring Story: या महिलेनं 20 वर्ष करत असलेली नोकरी सोडत सुरू केला बिझनेस, आज आहे करोडपती

Inspiration Story: माणसाकडे धडाडी असेल तर तो रुळलेला मार्ग सोडून इतर मार्गावर यशस्वी होऊ शकतो. Nykaa च्या फाल्गुनी नायर यांनी हेच सिद्ध केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 जानेवारी :अगदी छोट्या विचारांतून मोठी कंपनी जन्माला येऊ शकते. फक्त ध्येयप्राप्तीसाठी धाडस करायची तयारी हवी आणि चिकाटी हवी. लोकप्रिय इ कॉमर्स कंपनी ठरत असलेल्या नायका (Nykaa) च्या निर्मातीची गोष्ट अशीच प्रेरणादायी आहे. कुठल्याही वयात तुम्ही व्यवसायात पडू शकता आणि तो यशस्वी करू शकता, हेच नायकाच्या फाल्गुनी नायर  (Falguni nair) यांनी दाखवून दिलं आहे.

सौंदर्यप्रसाधनांसाठी प्रसिद्ध असलेली इ-कॉमर्स कंपनी (e-commerce company) 'नायका'ची (Nykaa) सुरुवात फाल्गुनी नायर यांनी 2012 साली केली. 2020 च्या शेवटी प्रसिद्ध झालेल्या 'कोटक वेल्थ लिडिंग वेल्दी वूमन लिस्ट'नुसार, नायका कंपनीची फाउंडर आणि सीइओ देशातील सर्वात श्रीमंत दहा महिलांमध्ये झळकल्या.

फाल्गुनी नायर यांची एकूण संपत्ती 5410 करोड इतकी आहे. फाल्गुनी यांनी IIM अहमदाबाद इथून बिझनेसचं शिक्षण घेतलं. 20 वर्ष केलेली नोकरी (job)सोडून त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली होती. त्या एका गुजराती कुटुंबात जन्मल्या-वाढलेल्या आहेत.

फाल्गुनी सांगतात, की त्यांचं सर्व लक्ष सौंदर्यप्रसाधनांच्या मार्केटला ऑनलाईन आणत सर्वांना चांगली सौंदर्य प्रसाधनं (beauty products) उपलब्ध करून देण्याकडं होतं. तेव्हा सगळे इ-कॉमर्स (e-commerce) प्लॅटफॉर्म्सवर खूप सूट देत अधिकाधिक लोकांना आकर्षित करत होते, तेव्हा 'नायका'नं मात्र वेगळं धोरण अवलंबलं. शेअर बाजार आणि व्यवसायाबद्दल त्यांच्या कुटुंबात पूर्वीपासूनच चर्चा होत असे. अमेरिकन बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेऊन वापस आलेली फाल्गुनीची मुलगी (daughter) अद्वैता हीसुद्धा आईसोबत याच व्यवसायात उतरली. ती फॅशन विभागाची चीफ आहे.

नायका कंपनीचा दावा आहे, की दर महिन्याला जगभरातून 55 लाखाहून अधिक लोक त्यांच्या संकेतस्थळाला भेट देण्यास येतात. दर महिन्याला त्यांच्याकडे 13 लाखाहून अधिक ऑर्डर्स येतात. कोरोना असतानाही जे 11 ब्रँड्स मोठे युनिकॉर्न बनले, त्यात 'नायका'सुद्धा एक आहे. युनिकॉर्न (unicorn) म्हणजे अशा कंपन्या ज्यांची किंमत 1 बिलियनपेक्षाही अधिक असते.

First published:

Tags: Ahmedabad, Gujrat, Inspiring story, Small business, Success story