मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोरोना लस देण्याऐवजी दिला रेबीजचा डोस, ठाण्यात धक्कादायक घटना

कोरोना लस देण्याऐवजी दिला रेबीजचा डोस, ठाण्यात धक्कादायक घटना

कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागात कोरोना लसीकरण सुरू असताना हा प्रकार घडला आहे.

कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागात कोरोना लसीकरण सुरू असताना हा प्रकार घडला आहे.

कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागात कोरोना लसीकरण सुरू असताना हा प्रकार घडला आहे.

ठाणे, 28 सप्टेंबर : एकाच व्यक्तीला 10 मिनिटांच्या अंतराने 3 लस दिल्याचा प्रकार ज्या ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) हद्दीत घडला होता त्याच ठाणे महानगरपालिकेच्या डाॅक्टर आणि नर्सने चक्क एका ठाणेकराला कोरोना ( corona vaccine) ऐवजी रेबीजची (rabies vaccine) लस दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  या प्रकरणी डॉक्टर (doctor) आणि परिचारिकेला (nurse) निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागात कोरोना लसीकरण सुरू असताना हा प्रकार घडला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर तातडीने चौकशी करुन आज दुपारी महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेच्यावतीने येथील डॉ. राखी तावडे आणि परिचारिका किर्ती पोपरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

इंजिनिअरिंगची कमाल! डोंगराखाली बोगद्यात सहा पदरी महामार्ग; वरून वाहतोय कालवा

विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी एका महिलेला एकाच वेळेस कोरोना लसीचे 3 डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातच समोर आला होता. सुदैवाने त्या महिलेला काही झाले नाही. तर पात्र नसतानाही सेलिब्रिटींना लस देण्याचा प्रकार ही ठाणे महानगरपालिकेतच घडला होता. या घटना ताज्या असतांनाच कोविड ऐवजी रेबीजची लस देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.

मित्राच्या आईशी असलेले अनैतिक संबंध बेतले जीवावर; डॉक्टरचा हॉटेलमध्ये नेऊन खून

या प्रकरणानंतर  महापौर नरेश म्हस्के यांनी तातडीने बैठक घेऊन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची कानउघाडणी केली. 'वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारांमुळे पालिकेची नाहक बदनामी होत आहे. हे असंच सुरू राहिले तर आरोग्य विभागात मोठे फेरबदल करावे लागतील, असा इशाराही महापौर नरेश म्हस्के यांनी दिला.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona vaccine, Thane municipal corporation