मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Latur: डोळ्यात मिरची पूड टाकून लोखंडी रॉडने घातले घाव; अनैतिक संबंधातून महिलेनं केला प्रियकराचा खेळ खल्लास

Latur: डोळ्यात मिरची पूड टाकून लोखंडी रॉडने घातले घाव; अनैतिक संबंधातून महिलेनं केला प्रियकराचा खेळ खल्लास

Murder in Latur: लातूरच्या चाकूर परिसरात एका 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या (brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Murder in Latur: लातूरच्या चाकूर परिसरात एका 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या (brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Murder in Latur: लातूरच्या चाकूर परिसरात एका 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या (brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

लातूर, 15 डिसेंबर: लातूरच्या चाकूर परिसरात एका 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या (brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञातांनी डोळ्यात मिरची पूड टाकून लोखंडी रॉडने घाव घातले (Attack with iron rod) होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या हत्येचा उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. आरोपींनी अनैतिक संबंधातून ही हत्या (Murder in immoral relationship) केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हणमंत व्यंकटी येरवे असं हत्या झालेल्या 42 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. मृत हणमंत याचं लातूर रोड परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. संबंधित महिला गेल्या दहा वर्षांपासून आपल्या पतीपासून विभक्त राहत आहे. पतीपासून वेगळं झाल्यानंतर, तिचं हणमंत येरवे याच्याशी सूत जुळलं होतं. पण कालांतराने हणमंतने दारू पिऊन संबंधित महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली. हणमंत याने अनेकदा आपल्या प्रेयसीला मारहाण देखील केली आहे.

हेही वाचा-दार बंद करत योगा टीचर महिलेसोबत नोकराचं अमानुष कृत्य; भयावह घटनेनं जालना हादरलं!

आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेचे आरोपी संतोष धोंडीराम घाडगे याच्याशी सूत जुळले. संतोष आणि आरोपी महिलेचे अनैतिक संबंध वाढत गेले आणि दुसरीकडे हणमंतचाही त्रास काही कमी झाला नाही. यामुळे महिलेनं आपल्या नवीन प्रियकराच्या मदतीने जुन्या प्रियकराची हत्या करण्याचा कट रचला. यातून महिलेनं रविवारी सायंकाळी हणमंतला दुचाकीवरून चाकूर याठिकाणी घेऊन गेली. याठिकाणी आरोपी महिलेनं एकाला फोन केला आणि हणमंतला मोहदळ भागातील एका आडवळणावर घेऊन गेली.

हेही वाचा-सेक्ससाठी नकार दिल्याने गाठला क्रूरतेचा कळस, पत्नीला जिवंतपणीच दिल्या नरक यातना

याठिकाणी आधीपासून दबा धरून बसलेल्या संतोष आणि त्याच्या एका साथीदाराने हणमंतच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लोखंडी रॉडने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की हणमंत जागीच मृत्यूमुखी पडला. आरोपींनी हणमंतचा मृतदेह तिथेच लपवून घटनास्थळावरून पळ काढला. पण सोमवारी सकाळी एका शेतकऱ्याला हा मृतदेह दिसल्यानंतर घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या हत्येची उकल केली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Latur, Murder