मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दार बंद करत योगा क्लास घेणाऱ्या मालकिणीसोबत नोकराचं अमानुष कृत्य; भयावह घटनेनं जालना हादरलं!

दार बंद करत योगा क्लास घेणाऱ्या मालकिणीसोबत नोकराचं अमानुष कृत्य; भयावह घटनेनं जालना हादरलं!

(फोटो-दिव्य मराठी)

(फोटो-दिव्य मराठी)

Murder in Jalna: जालना शहरातील अंबर हॉटेल परिसरात एका नोकरानं आपल्या मालकिणीची निर्घृण हत्या (servant killed Mistress) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk
जालना, 15 डिसेंबर: जालना (Jalna) शहरातील अंबर हॉटेल परिसरात एका नोकरानं आपल्या मालकिणीची निर्घृण हत्या (servant killed Mistress) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मालकासोबत झालेल्या वादानंतर नोकराने (Servant hassle with owner) मालकिणीला घरात कोंडून भयावह मृत्यू दिला आहे. मालकिणीची हत्या केल्यानंतर नोकराने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (servant attempt to commits suicide by drink poison) केला आहे. या थरारक घटनेनं जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे. संगीता आलोकनंद लाहोटी असं हत्या झालेल्या 62 वर्षीय मालकिणीचं नाव आहे. तर भीमराव धांडे असं आरोपी नोकराचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संगीता या आपल्या घरात योगा क्लास घेतात. त्यामुळे त्यांच्या घरी नेहमी अनेक महिलांच्या ये जा असते. घटनेच्या दिवशी मंगळवारी देखील काही महिला संगीता यांच्या घरी आल्या होत्या. यावेळी आरोपी नोकर भीमराव एका महिलेला बोलत उभा होता आणि तिचा मोबाइल नंबर मागत होता. हा प्रकार मृत संगीता यांनी पाहिला. हेही वाचा-PUBG च्या नादात भयंकर गुन्हा, अल्पवयीन तरुणाने केला 12 वर्षांच्या भावाचा खून त्यामुळे संगीता यांनी आपल्या नोकराची तक्रार पतीकडे केली. यातून संगीता यांचे पती आलोकचंद यांनी नोकराला चांगलंच झापले. राग अनावर झाल्याने नोकराने घरातील काच फोडली. यातील एक काच आलोकचंद यांच्यात पायात घुसली आणि वाद वाढत गेला. या वादातून घरमालक आलोकचंद यांनी नोकराला चापट आणि बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणी नोकराचा एक दात पडला. या घटनेनंतर नोकर आणि मालक दोघंही परस्परविरोधीत तक्रार देण्यासाठी सदर बाजार पोलीस ठाण्यात पोहोचले. हेही वाचा-डोळे उघडताच समोर दिसले 7 दरोडेखोर, गळ्याला तलवार लावून नवविवाहित जोडप्याला लुटलं पण या पोलीस ठाण्यात एकच महिला पोलीस उपस्थित होती. रक्तबंबाळ झालेले मालक आणि नोकर पाहून त्यांनी दोघांनाही रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. उपचार केल्यानंतर दोघांची तक्रार घेते असंही महिला पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे मालक आणि नोकर दोघंही पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. पण नोकराने रागाच्या भरात घर गाठलं आणि घराचा दरवाजा आतून बंद केला. किचनमधील चाकून घेत नोकराने संगीता यांच्या पोटावर, छातीत सपासप वार केले. हेही वाचा-प्रेयसीसाठी काहीही, भावी डॉक्टराने चोरल्या सोन्याच्या अंगठ्या, पुण्यातला VIDEO हा हल्ला इतका भयावह होता की, संगीता या घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि यातचं त्यांचा मृत्यू झाला. मालकिणीची हत्या केल्यानंतर घाबरलेल्या नोकराने देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दुसरीकडे, आलोकचंद जेव्हा घरी पोहोचले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरात संगीता या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, तर विषारी औषध घेतल्याने नोकरही बेशुद्धावस्थेत पडला होता. पोलिसांनी नोकराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Murder

पुढील बातम्या