हिंगोली, 15 डिसेंबर: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या (Wife refused to have sexual relation) कारणातून हिंगोलीतील (Hingoli) एका तरुणाने आपल्या पत्नीसोबत अमानुष कृत्य केलं आहे. नराधम आरोपीनं पीडितेला सिगरेटचे चटके (husband burn wife with Cigarettes) देत तिला अँटीसेप्टीक लिक्विड पाजलं आहे. आरोपी पती आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय पीडित विवाहितेनं मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यात पतीसह 9 जणांविरोधात फिर्याद दाखल (FIR Lodged) केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर, हा गुन्हा हिंगोली पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. या घटनेचा पुढील तपास हिंगोली पोलीस करत आहेत.
पती आकाश वाघमारे, बळीराम वाघमारे, राज टापरे, आदित्य वाघमारे, गंगाराम खिल्लारे, विजय खिल्लारे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. यांच्यासोबत अन्य तिघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील बावनखोली परिसरातील रहिवासी असणाऱ्या आकाश वाघमारे याने आपण शिक्षक असल्याची खोटी माहिती देऊन मुंबईतील शिवडी येथील रहिवासी असणाऱ्या तरुणीसोबत विवाह केला होता.
हेही वाचा-दार बंद करत योगा टीचर महिलेसोबत नोकराचं अमानुष कृत्य; भयावह घटनेनं जालना हादरलं!
लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस आनंदाने गेल्यानंतर, पतीने आणि सासरच्या मंडळींनी तिचा छळ करायला सुरुवात केली. तसेच आपला पती शिक्षक नसल्याचं देखील उघडकीस आलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर, पीडितेनं आपल्या नवऱ्याशी बोलणं बंद केलं. दरम्यान आरोपी पती लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पीडितेवर दबाव आणू लागला. पीडितेनं लैंगिक संबंधासाठी नकार दिल्याच्या कारणातून आरोपी पतीने क्रूरतेचा कळस गाठला आहे.
हेही वाचा-डोळे उघडताच समोर दिसले 7 दरोडेखोर, गळ्याला तलवार लावून नवविवाहित जोडप्याला लुटलं
आरोपी 24 वर्षीय पीडित विवाहितेला सिगरेटचे चटके देत, तिला अँटीसेप्टीक लिक्विड पाजलं आहे. पती आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहिता आपल्या माहेरी आली. इकडे आल्यानंतर तिने मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यात पतीसह एकूण नऊ जणांविरोधात फसवणूक आणि छळ केल्याची फिर्याद दाखल केली आहे. शिवडी पोलिसांनी हा गुन्हा हिंगोली पोलिसांकडे वर्ग केला आहे. या घटनेचा पुढील तपास हिंगोली पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news