मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

2 दुचाकींना चिरडत घरात घुसला भरधाव ट्रक; 20 वर्षीय तरुणीचा भयंकर शेवट, नांदेडमधील घटना

2 दुचाकींना चिरडत घरात घुसला भरधाव ट्रक; 20 वर्षीय तरुणीचा भयंकर शेवट, नांदेडमधील घटना

या घटनेत भरधाव वेगात आलेला एक ट्रक दोन दुचाकी चिरडत एका घरात घुसला. ट्रकच्या धडकेत घराची भिंत कोसळली आणि यात 20 वर्षीय तरुणी ठार झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nanded, India
  • Published by:  Kiran Pharate

अमित राय, नांदेड 26 सप्टेंबर : रस्ते अपघाताच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र, आता माणूस आपल्या घरातही सुरक्षित नसल्याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. नांदेडमधून एका विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. या घटनेत भरधाव वेगात आलेला एक ट्रक दोन दुचाकी चिरडत एका घरात घुसला. ट्रकच्या धडकेत घराची भिंत कोसळली आणि यात 20 वर्षीय तरुणी ठार झाली.

Satara : तलवारीनं वार आणि गोळीबार करत दरोडा, 50 तोळे सोने, 40 किलो चांदीची लूट, पाहा Video

वर्षा मदने असं या तरुणीचं नाव असून घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील पारडी मक्ता गावात ही घटना घडली. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरात घुसला. या अपघातात घरात असलेल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना घडली.

भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकीचाही या अपघातात चुराडा झाला आहे. दुचाकीला धडक देत घराची सरंक्षक भिंत तोडून ट्रक थेट घरात घुसला. या ट्रकने घरात असलेल्या 20 वर्षीय वर्षा मदने या तरुणीला चिरडलं.

ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची व्हॅन खोल दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू, हिमाचल प्रदेशमधील दुर्दैवी घटना

घटनास्थळी अर्धापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. अचानकपणे घडलेल्या या घटनेनं गावात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी ट्रक चालकाला चोपही दिला. यानंतर चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केलं गेलं. मात्र या अपघातात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.

First published:

Tags: Accident, Crime news