सातारा, 26 सप्टेंबर : साताऱ्यातील माण तालुक्यात असणाऱ्या दहिवडी जवळच्या मलवडी गावात एसटी स्टँड नजीक असणाऱ्या जयभवानी सोन्या-चांदीच्या दुकानाच्या व्यापाराला लुटण्याचा प्रकार घडलाय. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्रीकांत कदम हे दुकान बंद करून घरी जात असताना अज्ञात चार दरोडेखोरांनी त्यांना रस्त्यात अडवून मारहाण करत त्यांच्या हातातील बॅग हिसकावली. एका संशयिताने व्यावसायिकासह त्याच्या पुतण्यावर तलवारीने वार केले. तरीही, त्याला दोघांनी पकडून ठेवले. या संशयितास सोडवण्यासाठी लुटारूंनी गोळीबारही केला. त्यानंतर तिघे दुचाकीवरून पळून गेले. या खळबळजनक घटनेमुळे माण तालुक्यासह जिल्हा हादरला आहे. काय आहे प्रकरण? याबाबत अधिक माहिती अशी, मलवडी येथील बस स्थानक परिसरात मलवडी येथे श्रीकांत कदम यांचे जय भवानी ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. दिवसभर व्यवसाय केल्यानंतर दुकानातील सर्व ऐवज त्यांनी तीन पिशव्यांमध्ये भरला. त्यात ४० तोळे सोने, साधारण ५० किलो चांदी व रोख 7 लाख रुपये असा ऐवज होता. या पिशव्या घेऊन ते आपल्या दुचाकीवरून पुतण्या श्रीजित शिवाजी कदम याच्यासोबत घरी निघाले होते. चंद्रपूर हादरलं, एकाच कुटुंबातील 4 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू मलवडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र जवळून जात असताना अचानक एक जण समोर आला असता. संशय आल्यामुळे त्यांनी गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात अजून तिघे जण धावत आले. त्यांनी श्रीजितला जोरात मारले . त्यामुळे श्रीकांत यांचा गाडीवरील ताबा सुटून गाडी खाली पडली. गाडीवरून खाली पडलेल्या तीन पिशव्या दोघांनी उचलल्या व तिघे त्यांच्या दुचाकीकडे पळाले, तर एकाने तलवारीने श्रीजित याच्या हातावर, तर नंतर श्रीकांत यांच्या खांद्यावर वार केला. अशा अवस्थेतही या दोघा चुलत्या पुतण्यांनी मिळून या संशयिताला पकडून ठेवून जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली.
सातारा जिल्ह्यात दरोड्याचा थरार, 50 तोळे सोने आणि 40 किलो चांदीची लूट #Satara #CrimeNews #सातारा pic.twitter.com/6zlqzwmgMB
— News18Lokmat (@News18lokmat) September 26, 2022
आपला साथीदार परत आलेला नाही, हे लक्षात येताच एक जण दुचाकीवरून परत आला व त्याने पिस्टल मधून दोन वेळा गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी चुकवताना श्रीकांत यांनी पकडून ठेवलेल्या संशयितास पुढे केल्याने त्याच्या पाठीला चाटून गोळी गेली. ही झटापट सुरू असतानाच ग्रामस्थ जमा होऊ लागल्याने तीन दरोडेखोरा पळून गेले. या घटनेची माहिती दहिवडी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पकडलेल्या चोरावर प्राथमिक उपचार करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.