मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपूर हादरलं, मित्रांना मारहाण करून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपूर हादरलं, मित्रांना मारहाण करून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पोलिसांच्या तपासात आणखी धक्कादायक खुलासा पुढे आला असून पीडित मुलीचा मित्र देखील त्याच्या साथीदारांसोबत तिच्यावर अत्याचार करत असल्याचे पुढे आले.

पोलिसांच्या तपासात आणखी धक्कादायक खुलासा पुढे आला असून पीडित मुलीचा मित्र देखील त्याच्या साथीदारांसोबत तिच्यावर अत्याचार करत असल्याचे पुढे आले.

पोलिसांच्या तपासात आणखी धक्कादायक खुलासा पुढे आला असून पीडित मुलीचा मित्र देखील त्याच्या साथीदारांसोबत तिच्यावर अत्याचार करत असल्याचे पुढे आले.

नागपूर, 08 ऑक्टोबर :  उपराजधानी नागपूर (nagpur) कधी नव्हे इतक्या गुन्हेगाच्या घटनेने सतत हादरत आहे. आज परत एकदा नागपूरमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस पुढे आला. धक्कादायक म्हणजे, पीडित मुलगी ही आपल्या मित्रासोबत रस्त्यावर उभी असताना 3 नराधमांनी मित्राला मारहाण केली त्यानंतर रस्त्या लगत बाजूच्या शिवारात नेऊन पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार केला. या पीडितवर तिच्या मित्रांनी अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 वर्षीय अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस पुढे आला. माधवनागरी भागात गुरुवारी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास ही घटना ही घटना घडली. पीडित मुलगी ही आपल्या मित्रासोबत रस्त्यावर उभी असताना 3 नराधमांनी मित्राला मारहाण केली त्या नंतर रस्त्या लगत बाजूच्या शिवारात नेऊन पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार केला. पोलिसांच्या तपासात आणखी धक्कादायक खुलासा पुढे आला असून पीडित मुलीचा मित्र देखील त्याच्या साथीदारांसोबत तिच्यावर अत्याचार करत असल्याचे पुढे आले.

'तू घटस्फोट दे, मी तुझ्याशी लग्न करतो', पिंपरीत मित्राच्या बायकोवर बलात्कार

या प्रकरणात सामूहिक अत्याचार करणारे तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात पीडित मुलीने काही धक्कादायक खुलासे केले आहे.  मित्रांसह अटकेत असलेले चार मित्र हे पीडितचे मागच्या तीन चार दिवसांपासून सतत शोषण करत असल्याचे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आरोपींना बनवून अटक केली आहे.

शाळेनं मुलीला दिली 300 उठाबशा काढण्याची शिक्षा, आयुष्यभरासाठी आलं अपंगत्व

शहरातील सतत च्या अशा अत्याचारांच्या घटना ऐकल्यानंतर मुलींना देखील भीती वाटत असल्याचे पाहायला मिळत आहे. नॅशनल क्राईम ब्युरोच्या आकडेवारी नुसार अल्पवयीन मुलींच्या अत्याचारा संदर्भात नागपूर शहर हे देशात आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांना हे डोळ्यासमोर ठेवून कडक उपयोजना करण्याची गरज आहे.

First published:

Tags: Gang Rape, Nagpur, नागपूर