मराठी बातम्या /बातम्या /विदेश /शाळेनं मुलीला दिली 300 उठाबशा काढण्याची शिक्षा, आयुष्यभरासाठी आलं अपंगत्व

शाळेनं मुलीला दिली 300 उठाबशा काढण्याची शिक्षा, आयुष्यभरासाठी आलं अपंगत्व

विद्यार्थिनीकडून झालेल्या किरकोळ चुकीसाठी (Student becomes handicapped after school’s inhuman punishment) शाळेनं तिला इतकी कठोर शिक्षा दिली की तिला कायमचं अपंगत्व आलं.

विद्यार्थिनीकडून झालेल्या किरकोळ चुकीसाठी (Student becomes handicapped after school’s inhuman punishment) शाळेनं तिला इतकी कठोर शिक्षा दिली की तिला कायमचं अपंगत्व आलं.

विद्यार्थिनीकडून झालेल्या किरकोळ चुकीसाठी (Student becomes handicapped after school’s inhuman punishment) शाळेनं तिला इतकी कठोर शिक्षा दिली की तिला कायमचं अपंगत्व आलं.

बिजिंग, 8 ऑक्टोबर : विद्यार्थिनीकडून झालेल्या किरकोळ चुकीसाठी (Student becomes handicapped after school’s inhuman punishment) शाळेनं तिला इतकी कठोर शिक्षा दिली की तिला कायमचं अपंगत्व आलं. शालेय वयात मुलं काही ना काही खोड्या करतच असतात. काहीजण शाळा सुरु असताना डब्यातील खाऊ खातात, काहीजण शाळेत परवानगी नसलेल्या खाण्याच्या गोष्टी डब्यातून आणतात, तर काहीजण दप्तरात त्यांच्या आवडीची चॉकलेट्स लपवून ठेवतात. त्यासाठी मुलांना अनेकदा रागावण्यातही येतं. मात्र एका शाळेतील शिक्षकांना मुलीच्या एका किरकोळ गोष्टीचा इतका राग आला की त्यांनी तिला (Punishment of 300 sit-ups) थेट 300 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली.

झाली ही चूक

चीनमधील सिचुआन प्रांतात राहणाऱ्या 14 वर्षांच्या मुलीची नेहमीप्रमाणे ऑनलाईन शाळा सुरू होती. ऑनलाईन शाळा सुरु असताना मुलांना काहीही खाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र या विद्यार्थीनीच्या बेडवर काही खाण्याचे पदार्थ असल्याचं शिक्षकांना दिसलं. ते पाहून त्यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी मुलीला 300 उठाबशा काढण्याची शिक्षा सुनावली.

मुलीच्या आईने मागितली दाद

या मुलीच्या आईने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या पायाला काही दिवसांपूर्वी गंभीर दुखापत झाली होती. शाळेला आणि शिक्षकांना याची पूर्ण कल्पना होती. मात्र तरीही आपल्या मुलीला अशी अघोरी शिक्षा देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुलीला कॅमेरा बंद न करता 300 उठाबशा काढायला सांगण्यात आलं. एका शिक्षिकेनं ही शिक्षा देऊन दुसऱ्या एका शिक्षिकेला मुलीवर लक्ष ठेवण्याचीही जबाबदारी दिली.

हे वाचा - Shocking! Bum lift करताच तरुणीचा मृत्यू; नको त्या हौशेपोटी गमावला जीव

शिक्षा भोगतानाच मुलगी कोसळली

300 उठाबशा काढत असताना पहिल्या 150 उठाबशा झाल्यावरच मुलगी थकली आणि खाली कोसळली. घरच्यांनी तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र आती ही मुलगी आय़ुष्यात कधीच चालू शकणार नसल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. हे ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला.

शाळेकडून नुकसान भरपाई

शाळेनं या मुलीच्या खर्चाची सर्व जबाबदारी उचलण्याची तयारी दाखवली आहे. ही शिक्षा देणाऱ्या शिक्षकांना तातडीनं निलंबित करण्यात आल्याची माहितीही शाळेकडून देण्यात आली आहे.

First published:

Tags: Handicapped legs, Punishable, School teacher, Student