पिंपरी, 08 ऑक्टोबर: लग्नाचं आमिष दाखवत पिंपरीतील एका तरुणानं आपल्या मित्राच्याच बायकोवर अनेकदा बलात्कार (Rape on friend's wife) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपीनं आपल्या मित्राला दगा देत, त्याच्या बायकोसोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित (Sexual relation with friends wife) केले आहेत. एवढेचं नव्हे तर आरोपीनं पीडित महिलेला तिच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी देखील परावृत्त केलं आहे. नवरा घटस्फोट देण्यास तयार झाल्यानंतर मात्र आरोपीनं पीडितेशी लग्न करण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी 21 वर्षीय पीडित महिलेनं चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
अभिजीत राजेंद्र क्षिरसागर असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून तो पिंपरीतील टिंगरेनगर परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्षिरसागर हा पीडित महिलेच्या पतीच्या मित्र आहे. त्याचं नेहमी घरी येणं-जाणं होतं. यातूनच आरोपीनं पीडितेसोबत मैत्री केली. तसेच मित्राच्या नकळत पीडितेसोबत प्रेमसंबंध सुरू केले. यानंतर फिरायला जाण्याचं सांगत आरोपी पीडितेला डुडुळगाव येथील एका लॉजवर घेऊन गेला.
हेही वाचा-'...तुम्हाला काम देतो' सांगत डोंगरावर नेऊन महिलेसोबत भयावह कृत्य; पुण्यातील घटना
याठिकाणी आरोपी पीडितेला घटस्फोट देण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. 'तु तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे, तुझा नवरा काही कामाचा नाही, मी त्याला चांगला ओळखतो, तुझा घटस्फोट ज्या दिवशी होईल त्याच दिवशी मी तुझ्याशी लग्न करेल, असं आमिष आरोपीनं फिर्यादीला दाखवलं. पण फिर्यादीनं यासाठी नकार दिला असता आरोपीनं पीडितेशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून पीडितेवर अनेकदा बलात्कार केला आहे.
हेही वाचा-कारखाना मालकांकडून विवाहितेसोबत विकृतीचा कळस; 31 वर्षांपासून देत होते नरक यातना
आरोपीनं आपल्या प्रेम प्रकरणाची माहिती तुझ्या नवऱ्याला सांग आणि त्याला घटस्फोट दे यासाठी तगादा लावला. तसेच घटस्फोट दिलेल्या दिवशीच आपण लग्न करू असं आमिष देखील दाखवलं. यानंतर पीडितेनं आपल्या पतीला अनैतिक संबंधाची माहिती दिली. यानंतर पतीही घटस्फोट देण्यासाठी तयार झाला, याची माहिती फिर्यादीनं आरोपीला दिली असता. ऐनवेळी आरोपीनं लग्न करण्यास नकार देत तिची फसवणूक केली. याप्रकरणी पीडित महिलेनं चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pimpri chinchavad, Rape news