मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जे शहरात नाही जमले, ते गडचिरोलीच्या विद्यापीठाने करून दाखवले!

जे शहरात नाही जमले, ते गडचिरोलीच्या विद्यापीठाने करून दाखवले!

एवढ्या कमी कालावधीत ऑनलाइन परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडून निकाल जाहीर करणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातील बहुतेक पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

एवढ्या कमी कालावधीत ऑनलाइन परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडून निकाल जाहीर करणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातील बहुतेक पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

एवढ्या कमी कालावधीत ऑनलाइन परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडून निकाल जाहीर करणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातील बहुतेक पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

गडचिरोली, 22 ऑक्टोबर : कोरोना महामारीमुळे यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. परंतु, सर्व्हर डाऊनमुळे अनेक विद्यापीठांकडून परीक्षांसाठी 'तारीख पे तारीख' दिली जात असताना गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने मात्र, बाजी मारली आहे. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा आठ दिवसांमध्ये आटोपून दोन दिवसात 90 अभ्यासक्रमांचे अंतिम निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर बुधवारी सायंकाळी जाहीर केले आहे.  एवढ्या कमी कालावधीत ऑनलाइन परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडून निकाल जाहीर करणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातील बहुतेक पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

गोंडवाना विद्यापीठातर्फे 12 ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षांना सुरुवात झाली. गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील संलग्न असलेल्या 212 महाविद्यालयांचे 18 हजार 500 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात इंटरनेट सेवेचा अभाव असतानाही गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने सर्व पेपर यशस्वीरित्या घेतले.

अजित पवारांना कोरोनाची लक्षणं, क्वारंटाइन होण्याचा घेतला निर्णय

तत्पूर्वी 5 ऑक्टोबरला गोंडवाना विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा होणार होती. मात्र, पहिल्याच पेपरला इंटरनेटची तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पहिला पेपरच रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर आली होती.

नव्या वेळापत्रकानुसार, 12 ऑक्टोबरपासून ऑनलाइन परीक्षेला सुरुवात झाली. सकाळी 8.30 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पाच शिफ्टमध्ये परीक्षा आयोजित केली होती. परीक्षेसाठी पात्र एकूण विद्यार्थ्यांपैकी 95.93 टक्‍के विद्यार्थी ऑनलाइन तर 4.7 टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिली.

खडसेंवर मोठी जबाबदारी, राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला द्यावा लागणार राजीनामा?

परिक्षेदरम्यान, 96 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विद्यापीठाच्या योग्य नियोजनामुळे ऑनलाइन परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडून दोन दिवसात निकाल जाहीर करण्यात आम्ही यशस्वी ठरल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठ परिक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी दिली.

First published: