BREAKING : अजित पवारांना कोरोनाची लक्षणं, क्वारंटाइन होण्याचा घेतला निर्णय

BREAKING : अजित पवारांना कोरोनाची लक्षणं, क्वारंटाइन होण्याचा घेतला निर्णय

बुधवारी मंत्रालयात सुद्धा अजितदादा अनुपस्थितीत होते. तर आजचा राष्ट्रवादी कार्यालयातील जनता दरबार ही पवारांनी रद्द केला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर :  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाच्या परिस्थितीत सर्वात जास्त खबरदारी घेताना पाहिले आहे. पण, आता अजित पवार यांनाच कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे.

अजित पवार यांची तातडीने कोरोनाची चाचणीही करण्यात आली आहे. मात्र,कोरोनाचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे.  पण  ताप आणि थंडी सारखी लक्षणे असल्याने अजित पवार यांनी सार्वाजनिक कार्यक्रम थांबाविले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत अजित पवार यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला होता. ज्या ठिकाणी अजित पवार जात होते, त्यावेळी ते स्वत: आपल्यासोबत सेनिटायझर बाळगत होते.  इतरांनीही ते खबरदारी घेण्याचा सल्ला देत होते.

दोन दिवसांपासून अजित पवार यांना अचानक ताप आणि थंडी भरून आली. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे खबरदारी म्हणून अजितदादांनी स्वत: होम क्वारंटाउन होण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना सारखी काही लक्षणे आढळत असल्याने अजित पवार हे पुढील काही दिवस क्वारंटाइन राहणार आहे. अजितदादांनी आपले सर्व कार्यक्रम हे रद्द केले आहे.

बुधवारी मंत्रालयात सुद्धा अजितदादा अनुपस्थितीत होते. तर आजचा राष्ट्रवादी कार्यालयातील जनता दरबार ही पवारांनी रद्द केला आहे.

Published by: sachin Salve
First published: October 22, 2020, 9:11 AM IST
Tags:

ताज्या बातम्या