एकनाथ खडसेंना मिळणार मोठी जबाबदारी, राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला द्यावा लागणार राजीनामा?

एकनाथ खडसेंना मिळणार मोठी जबाबदारी, राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला द्यावा लागणार राजीनामा?

राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे असून मंत्रिपदही दिले जाणार असल्याची चर्चा आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. आता राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवण्यात येणार अशी चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसे यांना थेट मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी एका मंत्र्याला मंत्रिपद सोडावे लागणार आहे.

दैनिक महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. खडसे यांना मंत्रिपदही दिले जाणार आहे. परंतु, राष्ट्रवादीकडे असलेल्या सर्व जागा या भरलेल्या आहे. मात्र, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड किंवा कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा राजीनामा घेऊन ती जागा खडसेंना देण्यात येणार असल्याची राष्ट्रवादीत चर्चा आहे.

करमुसे प्रकरणामुळे जितेंद्र  आव्हाड हे अडचणीत सापडले आहे. हे प्रकरण न्यायालयात दाखल आहे. न्यायालयानेही या प्रकरणी कडक ताशेरे ओढले होते. विरोधकांनीही या प्रकरणावरून आव्हाडांना टार्गेट केले आहे. त्यामुळे आव्हाड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यात येण्यास सांगितले जाऊ शकते. लवकर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यपदाची निवड होणार आहे. त्यामुळे आव्हाड यांना प्रदेशाध्यपद बहाल करून मंत्रिपद हे खडसेंना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील हे तब्येतीच्या कारणामुळे फारसे सक्रीय राहत नसल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात आहे. त्यामुळे त्यांच्याही राजीनाम्याची राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा आहे.

विशेष म्हणजे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजीमुळे आपण पक्षातून बाहेर पडतोय असं सांगून एकच राजकीय भूकंप घडवला आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. तसंच भाजपला उत्तर देण्यासाठी खडसे हे भक्कम ठरणार आहे. त्यामुळेच खडसेंवर मोठी जबाबदारी ही सोपवली जाणार आहे.

'देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष सोडतोय'

दरम्यान, 'भाजप पक्ष सोडण्याचे एकमेव कारण म्हणजे, देवेंद्र फडणवीस हेच आहे. त्यांच्यामुळे आपण पक्ष सोडत आहोत. ते जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर गोंधळ घातला होता. पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून  गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते, असा गौप्यस्फोट खडसेंनी पक्ष सोडताना केला.

'खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मी फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा, नाईलाजाने तक्रार दाखल करावी लागली, असं उत्तर फडणवीस यांनी दिले. ते तपास करून तक्रार दाखल करा, असं सांगू शकत होते. पण, अत्यंत खालच्या स्ताराचे राजकारण करण्यात आले, अशी टीकाही खडसेंनी केली.

Published by: sachin Salve
First published: October 22, 2020, 8:34 AM IST
Tags:

ताज्या बातम्या