मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्राने देशाला दिल्या या 3 महत्त्वाच्या गोष्टी, COVID-19 विरोधातील लढ्यात राज्य ठरलं Game Changer!

महाराष्ट्राने देशाला दिल्या या 3 महत्त्वाच्या गोष्टी, COVID-19 विरोधातील लढ्यात राज्य ठरलं Game Changer!

India Fights Corona: कोरोनाविरोधातील लढ्यात आवश्यक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय सहभागात महाराष्ट्राने एक पाऊल पुढे टाकत देशाची मदत केली आहे. या लढाईत मैलाचा दगड ठरलेल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी महाराष्ट्रातून उदयास आल्या आहेत. जाणून घ्या सविस्तर.

India Fights Corona: कोरोनाविरोधातील लढ्यात आवश्यक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय सहभागात महाराष्ट्राने एक पाऊल पुढे टाकत देशाची मदत केली आहे. या लढाईत मैलाचा दगड ठरलेल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी महाराष्ट्रातून उदयास आल्या आहेत. जाणून घ्या सविस्तर.

India Fights Corona: कोरोनाविरोधातील लढ्यात आवश्यक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय सहभागात महाराष्ट्राने एक पाऊल पुढे टाकत देशाची मदत केली आहे. या लढाईत मैलाचा दगड ठरलेल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी महाराष्ट्रातून उदयास आल्या आहेत. जाणून घ्या सविस्तर.

पुढे वाचा ...

मुंबई, 20 एप्रिल: देशभरातील कोरोनाची रुग्णसंख्या (Coronavirus Cases in India) दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, तरी देखील दुसऱ्या लाटेचा धोका अद्यापही टळला नाही आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक जण कोरोनाशी, कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनशी किंवा निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत आहे. कोरोना विरोधातील या लढ्यात महाराष्ट्र राज्याने मोलाचा वाटा उचलला आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात आवश्यक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय सहभागात महाराष्ट्राने एक पाऊल पुढे टाकत देशाची मदत केली आहे. या लढाईत मैलाचा दगड ठरलेल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी महाराष्ट्रातून उदयास आल्या आहेत. जाणून घ्या सविस्तर.

1. PPE किटमध्ये व्हेंटिलेशन प्रणाली

पीपीई सूटमध्ये दीर्घकाळ घाम गाळणाऱ्या आरोग्य कर्मचार्‍यांना दिलासा देण्यासाठी डीएसटी समर्थित व्हेंटिलेशन प्रणाली महाराष्ट्रातच विकसीत करण्यात आली आहे. पुण्यातील स्टार्टअपने पीपीई किट्ससाठी विकसित केलेल्या एका सुटसुटीत, किफायतशीर वायुवीजन प्रणालीमुळे अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. अशा किट्स परिधान केल्यावर येणारा अतिरिक्त घाम रोखता येईल. पारंपारिक पीपीई किट्समध्ये एका साधा बदल करण्यात आला आहे. यामुळे जोडलेली वायुवीजन प्रणाली शरीराला आराम देते तसेच बुरशीजन्य आजारांना देखील प्रतिबंध करते.

हे वाचा-कोरोना काळात डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीबाबत सरकार गंभीर नाही,मुंबई HCनं फटकारलं

के जे सोमैया अभियांत्रिकी महाविद्यालयाचा  विद्यार्थी असणाऱ्या निहाल सिंग आदर्शने हे भन्नाट तंत्रज्ञान विकसीत केले आहे.  वॅट टेकनोव्हेशन्स स्टार्टअपद्वारे सोमैया विद्याविहार विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या  राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाच्या सहाय्याने  (NSTEDB) आरआयआयडीएल (रिसर्च इनोव्हेशन इनक्युबेशन डिझाईन लॅबोरेटरी) येथे 'कोव्ह-टेक व्हेंटिलेशन सिस्टम' नावाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. पुण्यातील दसॉं सिस्टीम्स येथील अत्याधुनिक प्रोटोटाइप सुविधेत विकसित केलेल्या या उत्पादनास वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अंतिम स्वरूप देण्यात आले. PIB ने प्रेस रीलिजच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

2. घरच्या घरी करता येईल कोरोना टेस्ट

लोकांना घरच्या घरी स्वतःची कोरोना चाचणी करता येईल अशा RAT टेस्टच्या किटला इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) मंजुरी दिली आहे. COVISELF (Pathocatch) असं या किटचं नाव आहे. पुण्यातील माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन लिमिटेडने ही टेस्ट किट (My Lab Discovery solution Ltd.) तयार करण्यात आली आहे. या किटमार्फत लोक आपल्या नाकातील स्वॅब सॅम्पल घेऊन आपली चाचणी करू शकतील.

हे वाचा-'मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन...?', दिल्लीनंतर मुंबईत पोस्टरबाजी, पाहा PHOTOS

आयसीएमआरने कोरोना टेस्टबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार लोक घरीसुद्धा अँटिजेन टेस्ट करू शकतात. ही होम टेस्टिंग फक्त अशा लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांसाठी आहे, जे लॅब टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या लोकांच्या संपर्कात आले आहेत.

3. कोरोना टेस्टसाठी स्वॅबची गरज नाही, गुळण्यांच्या माध्यमातून घेता येणार नमुने

नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) (Neeri) ने कोविड टेस्ट (Covid19 Test) संदर्भात एक मोठे संशोधन केले आहे. आता यापुढे कोविड टेस्टसाठी नाकातून किंवा घशातून नमुने (Swab test) घेण्याची गरज पडणार नाही. एक गुळलीच्या माध्यमातून कोविड टेस्ट नमुने घेता येणार आहे. याला "सलाईन गारगल" (Saline Gargle) RTPCR टेस्ट असे नाव देण्यात आले. यामुळे रुग्णाच्या नाकावाटे व घशावाटे घेतले जाणारे नमुने देतांना होणार त्रास कमी होणार आहे.

हे वाचा-माजी मुख्यमंत्र्यांचा कोरोनामुळे मृत्यू,या लाटेत 12हून जास्त MP-MLAनी गमावला जीव

याआधी अनेक नागरिकांना नाकावाटे व घशा वाटे नमुने देतांना इजा झाल्याच्या घटना पुढे आल्या होत्या. अनेकांना नाकावाटे किंवा घशावाटे नमुने देतांना हायपर टेन्शनचा त्रास होत होता तो त्रास यापुढे बंद होणार आहे. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) ने कोविड टेस्टिंग संदर्भात केलेले हे संशोधन महत्वाचे व उपयुक्त मानले जात आहे. सोबतच या टेस्टिंग प्रक्रियेत  RNA extraction किटची गरज नाहीशी होणार असल्याने कमी वेळात कोविडचा अहवाल प्राप्त आहे.

 

First published:

Tags: Corona, Coronavirus