जयपूर, 20 मे: राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पहाडिया यांचं कोरोनामुळे (Jagannath Pahadia Passed away) निधन झालं आहे. पहाडिया यांच्या निधनानंतर राजस्थानमध्ये गुरुवारी एक दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे. पहाडिया यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांसारख्या अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्क केलं आहे.
पहाडिया यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री अशा अनेक पदांवर काम केलं होतं. त्यांच्या जाण्याने राजस्थानच्या राजकारणात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्वीट करत त्यांचं दु:ख व्यक्त केलं आहे.
प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री श्री जगन्नाथ पहाड़िया जी के निधन की खबर बेहद दुखद है। श्री पहाड़िया ने मुख्यमंत्री के रूप में, राज्यपाल के रूप में, केंद्रीय मंत्री के रूप में लम्बे समय तक देश की सेवा की, वे देश के वरिष्ठ नेताओं में से थे।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) May 19, 2021
दरम्यान कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये आपल्या देशाने सामान्य नागरिकांबरोबरच देशातील अनेक बड्या नेत्यांना गमावलं आहे. गेल्या दोन महिन्यात ही आकडेवारी अधिकच वाढली आहे.
हे वाचा-'मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन...?', दिल्लीनंतर मुंबईत पोस्टरबाजी, पाहा PHOTOS
देशभरातील आमदार-खासदारांचा कोरोनामुळे मृत्यू
महाराष्ट्रानेही काही दिग्गज नेत्यांना या कोरोनाच्या लढ्यात गमावलं आहे. 16 मे रोजी काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनानं निधन झालं आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. एप्रिल महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होते.
उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात झालेली हानी मोठी आहे. याठिकाणी 23 एप्रिल रोजी लखनऊ पश्चिममधील आमदार सुरेश श्रीवास्तव, औरैयाचे रमेश चंद्र दिवाकर, 28 एप्रिल रोजी बरेलीच्या नवाबगंजचे आमदार केसर सिंह गंगवार, 7 मे रोजी सलोन विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार आणि माजी मंत्री दल बहादुर कोरी आणि सरकारमधील मंत्री आणि मुजफ्फरनगरच्या चरथावल याठिकाणचे आमदार विजय कश्यप यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हे वाचा-महामारीपासून वाचण्यासाठी बनवलं थेट कोरोना देवीचं मंदिर, केला जातोय अजब दावा
बंगालमध्ये देखील चित्र वेगळं नाही आहे. याठिकाणी बरुईपूर पूर्व मतदारसंघात दोन वेळा आमदार म्हणून निवडून येणारे निर्मल मंडल यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते 61 वर्षांचे होते. मध्य प्रदेशात काँग्रेस आमदार आणि माजी राज्य मंत्री ब्रिजेंद्र सिंह राठोड यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भोपाळमध्ये एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
राजस्थानमध्ये धरियावादचे आमदार गौतम लाल मीणा, राजसमंदचे भाजप आमदार किरण माहेश्वरी, सहाडातील काँग्रेस आमदार कैलाश त्रिवेदी आणि वल्लभनगरचे काँग्रेस आमदार गरेंद्र सिंह शक्तावत यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus