Home /News /maharashtra /

लवकरच माजी आमदार NCP मध्ये करणार प्रवेश, स्वतः जयंत पाटील यांनी दिली माहिती

लवकरच माजी आमदार NCP मध्ये करणार प्रवेश, स्वतः जयंत पाटील यांनी दिली माहिती

जयंत पाटील यांच्या माहितीनंतर एकच खळबळ उडाली आहे. मात्र प्रवेश करणाऱ्या नेत्यांची नाव यावेळी जयंत पाटील यांनी सांगितली नाहीत. सांगलीमध्ये जयंत पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सांगली, 26 जानेवारी: सांगली (Sangli) जिल्ह्यातील काही माजी आमदार (Former MLAs) लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Join NCP) प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी ही माहिती दिली आहे. जयंत पाटील यांच्या माहितीनंतर एकच खळबळ उडाली आहे. मात्र प्रवेश करणाऱ्या नेत्यांची नाव यावेळी जयंत पाटील यांनी सांगितली नाहीत. सांगलीमध्ये जयंत पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नेते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करत आहेत. प्रत्येक गुरुवारी मुंबईमध्ये मोठ्या संख्येने नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, सांगलीत पण काही दिवसात इनकमिंग झालेले दिसेल, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. सांगलीत 2 माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर! काल समोर आलेल्या माहितीनुसार, सांगलीमध्ये भाजपचे दोन माजी आमदार (bjp ex mla) राष्ट्रवादीच्या (ncp) गळाला लागले आहे. लवकरच या दोन नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला होता. तसंच नबाव मलिक यांनीही तशी शक्यता बोलूनही दाखवली आहे. अखेर जयंत पाटील यांच्या सांगलीत लवकरच भाजपचा करेक्ट कार्यक्रम होण्याची चिन्ह आहे. Breaking News: धनंजय मुंडेंसमोर आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर ओतलं डिझेल मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे दोन माजी आमदार हे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीत जाण्यासाठी तयारी केली आहे. या दोन्ही नेत्यांबद्दल राष्ट्रवादीने कमालीची गुप्तता बाळगली आहे. लवकरच त्यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील आणि शिराळयाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक या चार पैकी 2 आमदारांच्या नावाची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही माजी आमदार आधी राष्ट्रवादीमध्ये होते. २०१९ च्या निवडणुकीच्या दरम्यान या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची एकाप्रकार घरवापसी होणार आहे. त्यामुळे हे दोन नेते कोण आहे, याबद्दल सांगलीमध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण आहे. मालेगावात काँग्रेसला खिंडार, 27 नगरसेवक राष्ट्रवादीत दरम्यान, मालेगाव महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मालेगावात मोठा हादरा बसला आहे. माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख यांच्यासह 27 नगरसेवक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. येत्या 27 जानेवारीला सर्वजण मुंबईतला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती रशीद शेख यांनी दिली. VIDEO - वयाच्या सातव्या वर्षी 4000 पुशअप्स मारून केला World record; सोळाव्या वर्षी त्याला ओळखणंही मुश्कील  या अगोदर माजी आमदार असिफ शेख यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले असून आता त्यांचे वडील माजी आमदार रशीद शेख आई महापौर ताहेरा शेख सोबत 27 नगरसेवक देखील राष्ट्रवादी प्रवेश घेत आहे. रशीद शेख हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जात होते. एवढंच नाहीतर रशीद शेख हे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. 2006 साली मालेगावात बॉम्बस्फोट झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी मालेगावला भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी त्यांचे कौतुकही केले होते. पण असे असतांनाही त्यांनी काँग्रेस सोडल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: NCP, Sangali

पुढील बातम्या