जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - वयाच्या सातव्या वर्षी 4000 पुशअप्स मारून केला World record; आता सोळाव्या वर्षी त्याला ओळखणंही मुश्कील

VIDEO - वयाच्या सातव्या वर्षी 4000 पुशअप्स मारून केला World record; आता सोळाव्या वर्षी त्याला ओळखणंही मुश्कील

VIDEO - वयाच्या सातव्या वर्षी 4000 पुशअप्स मारून केला World record; आता सोळाव्या वर्षी त्याला ओळखणंही मुश्कील

वर्ल्ड्स स्ट्राँगेस्ट बॉय म्हणून ओळखला जाणारा हा मुलगा (World’s strongest boy) 9 वर्षांत इतका बदलला आहे की…

  • -MIN READ
  • Last Updated :

किव्ह, 26 जानेवारी : अवघ्या 7 वर्षांचा मुलगा ज्याचा फिटनेस, बॉडीबिल्डिंग पाहून भलेभले थक्क झाले. इतक्या कमी वयात त्याने मेहनत, व्यायामाने फक्त आपली बॉडीच बनवली नाही तर आपल्या नावार वर्ल्ड रेकॉर्डही (World Record) केला. युक्रेनचा अँड्रे कोस्टाश (Andrey Kostash) जगातील सर्वात मजबूत मुलगा (World’s strongest boy) म्हणून जगात प्रसिद्ध झाला आता तो 16 वर्षांचा झाला आहे. पण त्याला ओळखणंही अशक्य झालं आहे. अँड्रेने वयाच्या पाचव्या वर्षापासूनच एक्सरसाइझ, जिमनॅस्ट, मार्शल आर्ट सुरू केलं होतं. सुरुवातीला वडिलांकडून त्याने प्रशिक्षण घेतलं. नंतर त्याने प्रोफेशनल ट्रेनिंग आणि वर्कआऊट सुरू केलं.  युक्रेन गॉट टॅलेंट (Ukraine’s Got Talent) या रिअॅलिटी शोमधून अँड्रे सर्वांसमोर आला. वयाच्या सातव्या वर्षी कमी वेळात सर्वात जास्त पुशअप्स मारून त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 2 तास 21 मिनिटांत त्याने सलग 4000 पुशअप्स मारल्या आणि वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याची नोंद झाली. त्याचा स्वतःचा रेकॉर्ड हा एकाच वेळी 6000 पुशअप्सचा आहे. हे वाचा -  Shocking! जोशात 167 किलो वजन उचलायला गेली तरुणी; हात तुटून धडापासून वेगळा झाला आता हाच अँड्रे 16 वर्षांचा झाला आहे. तो इतका बदलला आहे, की हा तोच अँड्रे आहे का? असा प्रश्न पडेल. किशोरवयात तो एखाद्या मॉडलसारखा दिसतो आहे.

जाहिरात

वर्ल्ड रेकॉर्ड करून प्रसिद्ध झाल्यानंतर अँड्रीने आता अभिनय क्षेत्राला आपलं करिअर बनवलं. तो आता प्रोफेशनल बॉडीबिल्डिंग करत नाही पण आपल्या बॉडी आणि फिटनेसची काळजी घेतो. आपल्या फॅन्ससोबत आपले वर्कआऊटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो. हे वाचा -  तरुणांनाही लाजवेल असा आजीआजोबांचा VIDEO; या वयस्कर कपलला पाहून नेटिझन्स हैराण आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बॉडीबिल्डिंग, वर्कआऊट, कराटे, जिमनॅस्ट यासोबतच प्रवास, मनोरंजन, छंदयाबाबतही सांगतो. हे चॅनेल अँड्रीचं पर्सनल, प्रोफेशनल आणि सोशल लाइफची माहिती देतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात