बीड, 26 जानेवारी: बीडमधून (Beed) मोठी बातमी समोर येत आहे. बीड पोलीस मुख्यालयावर एकानं (Beed police headquarters) आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासमोरच याव्यक्तीनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. झेंड्यांच्या समोरचं अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं समजतंय. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
बीड पोलीस मुख्यालयावर एकाचा धनंजय मुंडेंसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न pic.twitter.com/Y4wzjpWwlc
— News18Lokmat (@News18lokmat) January 26, 2022
बीड शहरातील पंचशील नगर भागातील रस्त्याच्या बोगस कामाची तक्रार करूनही कारवाई न झाल्याने या व्यक्तीनं हे पाऊल उचललं आहे. विनोद शेळके असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.
बीड पोलीस मुख्यालयावर एकाचा धनंजय मुंडेंसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न.. pic.twitter.com/nmZgEJN575
— News18Lokmat (@News18lokmat) January 26, 2022
मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर अन् झेंडावंदन स्थळी आत्मदहनाचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडाली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न Satara District) सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Satara District Collector’s Office ) महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची बातमी समोर येतेय. अंगावर पेट्रोल टाकत महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल नसल्याचा आरोप या महिलेनं केला आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचे आत्मदहन... pic.twitter.com/pK2tGbZGDo
— News18Lokmat (@News18lokmat) January 26, 2022
साताऱ्यातील पीडित नलावडे कुटुंबीयांतील पत्नीनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवानं पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला वाचवण्यात आलं आहे. साताऱ्यातील पीडित नलावडे कुटुंबीयांतील पत्नीनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवानं पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला वाचवण्यात आलं आहे.