पुणे, चंद्रकांत फुंदे ; 29 जून : मागच्या एक आठवड्यापासून राज्यात राजकीय नाट्य पहायला मिळत आहे. शिवसेनेत बंड (shiv sena rebel mla) करत एकनाथ शिंदे (eknath shinde guwahati) यांनी 40 आमदारांसह सुरत मार्गे गुवाहाटी गाठले. गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यासाठी अनेक माजी आमदारांनीही पाठींबा दिला आहे. दरम्यान आता पुण्यातही शिवसेनेला (pune shiv sena) धक्का पोहोचला आहे. यामुळे पुणे शिवसेनेत मोठी खिंडार पडल्याचे बोललो जात आहे. माजी मंत्री विजय शिवतारे (former minister vijay shivtare) हे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते लवकरच शिंदे गटात सामील होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुण्यात शिवसेना वाढीसाठी विजय शिवतारे यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. शिवतारे यांनी तालुक्यातील कामे होत नाहीत, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती तोडावी असे सांगितले आहे. ते सर्व पदाधिकऱ्यांसोबत बैठका सुरू आहेत यामध्ये एकनाथ शिंदे गटात जाण्याचे ठरवले आहे. आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा : राज्यपालांना भेटून फडणवीसांनी केली फ्लोअर टेस्टची मागणी, पाहा भाजपचं पत्र जसंच्या तसं
विजय शिवतारेच्यां भूमिकेमुळे शिवसेनेला पुणे जिल्ह्यात मोठी खिंडार पडणार आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने कामे करण्यास अडचणी येत असल्याने हा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान 2014 ते 2019 काळात विजय शिवतारे हे मंत्री होते.
एकनाथ शिंदेंच्या मदतीला आता गुजरात सरकार, आज होणार वाटाघाटी?
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. आता या सत्तासंघर्षामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांना भेटून अधिकृत एंट्री केली आहे. आता भाजपकडून जोरदार हालचालींना वेग आला आहे. गुजरातमधील (gujarat) काही मंत्री हे गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पोहोचणार आहे.
हे ही वाचा : शरद पवार-सोनिया-ठाकरे फोनवरच्या चर्चेत काय झाला फायनल निर्णय? कॅबिनेट बैठकीनंतर मोठ्या बातमीचे संकेत
एकनाथ शिंदे यांनी सुरतमध्ये बंडाची बिजं पेरली होती. त्यानंतर आता गुजरातमधील भाजप एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावणार आहे. गुजरात सरकारने मंत्रिमंडळाची बैठक रद्द केली आहे. मुख्यमंत्री भूपेंद पटेल (gujarat cm bhupendra patel) यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील आणि पटेल यांच्यामध्ये एक बैठक झाली आहे.लवकरच सत्तास्थापनेसाठी महत्त्वाच्या असलेल्या वाटाघाटींवर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याआधी या दोन्ही नेत्यांवर वाटाघाटीची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Pune, Pune (City/Town/Village), Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)