Home /News /sport /

T20 World Cup 2021 : धोनी भारताचा मेंटर, तर माहीचाच मित्र झाला पाकिस्तानचा कोच

T20 World Cup 2021 : धोनी भारताचा मेंटर, तर माहीचाच मित्र झाला पाकिस्तानचा कोच

टी-20 वर्ल्ड कपआधी पाकिस्तानला मिळाला नवा कोच

टी-20 वर्ल्ड कपआधी पाकिस्तानला मिळाला नवा कोच

ऑस्ट्रेलियाला दोन वेळा वर्ल्ड कप जिंकवून देणारा आणि चेन्नई सुपरकिंग्समधला (CSK) एमएस धोनीचा (MS Dhoni) सहकारी मॅथ्यू हेडन (Mathew Hayden) याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) कोच म्हणून नियुक्ती केली आहे.

    मुंबई, 13 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताने एमएस धोनीला (MS Dhoni) टीमचा मेंटर केलं, यानंतर आता पाकिस्ताननेही धोनीच्याच सहकाऱ्याला टीमचा मुख्य कोच केलं आहे. ऑस्ट्रेलियाला दोन वेळा वर्ल्ड कप जिंकवून देणारा आणि चेन्नई सुपरकिंग्समधला (CSK) एमएस धोनीचा सहकारी मॅथ्यू हेडन (Mathew Hayden) याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) कोच म्हणून नियुक्ती केली आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये हेडन पाकिस्तानचा मुख्य कोच आणि दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर व्हर्नन फिलेंडर (Vernon Philander) बॉलिंग कोच असेल. 17 ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. स्पर्धेमध्ये भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध 24 ऑक्टोबरला होणार आहे. दुसरीकडे रमीझ राजा (Ramiz Raja) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले आहेत. राजा यांच्या नियुक्तीनंतर लगेचच हेडन आणि फिलँडर यांची कोच म्हणून घोषणा करण्यात आली. हेडनने आपल्या करियरमध्ये 103 टेस्ट, 161 वनडे आणि 9 टी20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या. हेडनने 30 शतकं आणि 29 अर्धशतकांसह 8,625 रन केल्या. याशिवाय वनडेमध्येही त्याने 10 शतकं आणि 36 अर्धशतकांच्या मदतीने 6,133 रन केले. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 4 अर्धशतकांसह हेडनने 308 रन केले. दुसरीकडे व्हर्नन फिलँडर हा काही काळ टेस्ट क्रिकेट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. 64 टेस्टमध्ये त्याने 224 विकेट मिळवल्या. तसंच 30 वनडेमध्ये त्याच्या नावावर 41 विकेट आणि 7 टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 4 विकेट आहेत. रमीझ राजा बिनविरोध रमीझ राजा यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. राजा यांनी एहसान मणी यांची जागा घेतली आहे. याआधी राजा 2003-04 मध्ये बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. रमीझ राजा यांचं नामांकन पंतप्रधान आणि बोर्डाचे मुख्य संरक्षक इम्रान खान यांनी केलं होतं. रमीझ राजा यांच्या आधी अब्दुल हफीज कारदार ( 1972 ते 1977), जावेद बुर्की (1994 ते 1995) आणि एजाज बट (2008 ते 2011) हे पीसीबीचे अध्यक्ष झालेले माजी क्रिकेटपटू होते. रमीझ राजा यांनी पाकिस्तानकडून 1984 ते 1997 या काळात 205 पेक्षा जास्त मॅच खेळून 8,674 रन केले. याशिवाय ते 1992 च्या वर्ल्ड कप विजेत्या पाकिस्तानी टीममध्येही होते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Pakistan, T20 world cup

    पुढील बातम्या