Home /News /maharashtra /

राज्यभर दूध आंदोलनाला आक्रमक सुरुवात, सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी

राज्यभर दूध आंदोलनाला आक्रमक सुरुवात, सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी

अनेक गावांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादक शेतकरी हे रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत.

    अमरावती, 01 ऑगस्ट : दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दूधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचं आंदोलन तीव्र करण्याची हाक किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिली होती. आज या आंदोलनाला विविध गावांतून सुरुवात झाली आहे. अनेक गावांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादक शेतकरी हे रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. दूधाला प्रति लिटर किमान 30 रुपये भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर 10 रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, 26 जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशातून 10 लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला शेतकऱ्यांचा घात करणारा निर्णय तातडीने रद्द करा, जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा, आणि देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान 50 रुपये अनुदान द्या, या मागण्यांसाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्या वतीने 20 जुलै पासून राज्यात आंदोलन सुरू आहे. त्यावर आजपासून आता हे आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. '5 चुकांमुळे मला UPSCमध्ये 4 वेळा अपयश आलं', IPS अक्षत कौशल यांची कहाणी राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन असताना सर्व दुकानं, होटल्स बंद असल्याने शेतकऱ्यांच्या दूधाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आज अमरावती इथं भाजप व किसान मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी माजी कृषि मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महमार्गावर दूधाच्या गाड्या अडवून सरकार विरोधी घोषणा देत आंदोलन केलं. महाराष्ट्रात दररोज दूधाचे उत्पादन 1 कोटी 40 लाख लिटरच्या आसपास होते. कोरोनाच्या संकटामुळे दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कोरोनाच्या परीस्थितीमुळे राज्यातील सर्व हॉटेल्स, स्वीट होम, चहा टपरी, डोमीनोज्स पिज्जा अशाप्रकारे दूध व दूधाच्या पदार्थाची विक्री करणारी साधनंही बंद झाली आहेत. परिणामी 20 मार्च 2020 पासून पिशवी पाकिंग दूधाचा खप 30 ते 35 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तसंच दूधाच्या प्रोडक्टची विक्री 10% ते 15% खाली आली आहे. मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळणार, पालिकेने घेतला मोठा निर्णय दूधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे. तरी राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर 10 रुपये अनुदान द्यावं अथवा गाईचे दूध प्रती लिटर 30 रु. दराने खरेदी करावे. या मागणीसाठी अमरावती इथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रीय महामार्गावर दूधाच्या गाड्या अडवून आंदोलन केलं आणि सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. या झोपलेल्या सरकारला जाग येत नसेल तर लोकप्रतिनिधिंच्या घरातील दूध बंद करू असा इशारा माजी कृषि मंत्री अनिल बोंडे यांनी दिला आहे. पुढच्या 8 दिवसांत कोरोना हरवण्यासाठी पुणे होणार सज्ज, मुख्यमंत्र्यांनी दिला आदेश दरम्यान, आज पहाटेच माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी संत नामदेव पायरीचं दर्शन घेऊन, चंद्रभागा नदीत जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीस दुग्धाभिषेक करून आंदोलनाची सुरूवात केली. दूधाला 30 लिटर दर मिळाला पाहिजे. एमएमआरडीएकडे कोट्यावधी रूपये पडून आहेत. ते दूध उत्पादकांना द्यावे. केंद्र सरकारकडे बोट दाखवणं बंद करावं. सत्तेतील मंत्र्यांचे दूध संघ वाचवण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याची टीका यावेळी जानकर यांनी केली आहे.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या