UPSC परीक्षा पास होणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी मेहनत तर हवीच पण सतर्क, हजरजबाबी वृत्ती आणि सद्सद् विवेकबुद्धी आणि आपल्या क्षमतांचा पुरेपुर वापर करून यश मिळवता यायला हवं. प्रत्येकजण ही परीक्षा देत असताना अगदी छोट्या चुकांमुळे मार्क घालवतो आणि यश निसटतं. IPS अक्षत कौशल यांनी तर तब्बल 4 वेळा अपयश पचवलं
आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्यांकडे दुर्लक्ष करू नका. परीक्षेत जे विषय चांगले आहेत त्यांचाही अभ्यास हवा. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा येत म्हणून कमी अभ्यास केला तर त्याचाही मोठा फटका पेपरला किंवा मुलाखतीसाठी बसू शकतो. अक्षत यांना लेखन कौशल्य खूप चांगलं अवगत असूनही पेपरमध्ये कमी मार्क मिळण्याचं हे कारण असल्याचं त्यांनी सांगितलं.