जाहिरात
मराठी बातम्या / देश / 24 तासांत मुंबईनं वाढवली देशाची चिंता, प्रत्येक तासाला होतोय एकाचा मृत्यू

24 तासांत मुंबईनं वाढवली देशाची चिंता, प्रत्येक तासाला होतोय एकाचा मृत्यू

24 तासांत मुंबईनं वाढवली देशाची चिंता, प्रत्येक तासाला होतोय एकाचा मृत्यू

गेल्या 24 तासांत भारतात 6566 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 194 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 मे : भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. गेल्या 24 तासांत भारतात 6566 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 194 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 लाख 58 हजार 333 झाला आहे. यातील 86 हजार 110 रुग्ण सक्रिय आहेत तर, आतापर्यंत 67692 लोकं निरोगी झाली आहेत. मृतांचा आकडा हा 4531 आहे. कोरोनामुळं इतर राज्यांच्या मानानं महाराष्ट्रात जास्त प्रकरणं आहे. गेल्या 34 तासांत महाराष्ट्रात 2190 प्रकरणं समोर आली आहेत. सलग 11व्या दिवशी महाराष्ट्रात 24 तासांत 2 हजारहून अधिक रुग्ण वाढले आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात 2091, 25 मे रोजी 2436, 24 मे रोजी 3041, 23 मे रोजी 2608, 22 मे रोजी 2940, 21 मे रोजी 2345, 20मे रोजी 2161, 19 मे रोजी 2078, 18 मे रोजी 2005 आणि 17 मे रोजी 2347 नवीन रुग्ण सापजले होते. त्यामुळं आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 56 हजार 948 झाला आहे. तर, 1897 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत 1044 नवीन प्रकरणं समोर आली आहेत तर 32 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

वाचा- कोरोनाचा कहर सुरूच, मृतांच्या आकड्यांमध्ये चीनलाही मागे टाकणार भारत? मृतांच्या आकड्यात भारत 14व्या क्रमांकावर कोरोनामुळं मृतांच्या आकड्यांमध्ये भारताचा 14वा क्रमांक लागतो. अमेरिका, ब्रिटन आणि इटली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर फ्रान्स, स्पेन, ब्राझील, बेल्जियम, जर्मनी, मॅक्सिको, नॉर्व्हे आणि इराण यांचा क्रमांक लागतो. तर कॅनाडा 11व्या, नेदरलॅंड 12, चीन 13 आणि भारत 14व्या क्रमांकावर आहे. वाचा- कोव्हिड-19 रुग्णालयालाच लागली भीषण आग, 5 कोरोना रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू अमेरिकेत 1 लाख लोकांचा मृत्यू जगभरात आतापर्यंत 57.34 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एकट्या अमेरिकेत 17.33 कोरोना रुग्ण आहे. सध्या अमेरिकेत एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाले आहे. कोणत्याही आपत्तीपेक्षा अमेरिकेतील मृतांची संख्या ही जास्त आहे. याशिवायत ब्रिटेन (37,460) दूसऱ्या आणि इटली (33,072) तिसऱ्या क्रमांकावर आहे. वाचा- धक्कादायक! मुंबईतील अपंग मुलाला शिर्डीतील क्वारंटाईन सेंटरमध्ये अमानुष मारहाण आशियामध्ये सर्वात जास्त मृत्यू इराणमध्ये आशियामध्ये सर्वात जास्त मृत्यू इराणमध्ये झाले आहेत. इराणमध्ये आतापर्यंत 7 हजार 564 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणनंतर चीन आणि भारताचा क्रमांक लागतो. आतापर्यंत मृतांच्या आकड्यात चीन दुसऱ्या क्रमांकावर तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात