मुंबई,19 जानेवारी: ‘नाईट लाईफ’ सुरु करण्यासाठी तेवढा पोलिस स्टाफ आहे का? 26 जानेवारीच्या रात्रीपासून ‘नाईट लाईफ’ सुरु करण्याचा अजून कोणताही निर्णय झाला नाही, असे सकाळी सांगणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संध्याकाळी यू-टर्न घेतला. गृहमंत्री देशमुख यांनी सांयकाळी ट्वीट करून शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचा ‘नाईट लाईफ’ सुरु करण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले.
Aditya Thackreyji's Nightlife proposal could be served better & implemented soon if it is limited to certain places like BKC, Lower Parel, Marine Drive and few other malls.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 19, 2020
नाईट लाईफवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने? कारण 26 जानेवारीच्या रात्रीपासून नाईट लाईफ सुरु करण्याचा अजून कोणताही निर्णय झालेली नाही, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी सकाळी म्हटलं होतं. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबईतील नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर पडतो की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने येण्याची शक्यताही निर्माण झाली होती. ‘मुंबई पोलिसांचं अश्वदल पुन्हा सुरू होणार’ मुंबई पोलिसांचं अश्वदल पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. मुंबईत पोलिसांकडे याआधी अश्वदल होतं. 1932 मध्ये हे दल बंद करण्यात आलं होतं. आता तब्बल 88 वर्षांनी हे युनिट सुरु होणार आहे. कसं असेल अश्वदल? मुंबई पोलिसांच्या या अश्वदलामध्ये 30 घोडे असणार आहेत. पेट्रोलिंग, ट्राफिकसाठी या दलाचा वापर केला जाणार आहे. 26 जानेवारीपासून हे युनिट सुरू होणार आहे. बृहन्मुंबई माउंटेड पोलीस युनिट 1 सब इन्सपेक्टर, 1 एएसआय, 4 हेडकॉन्स्टेबल, 32 कॉन्स्टेबल असणार आहेत. तसंच जमावावर नियंत्रण करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. घोड्यावर बसल्याने उंचीवरुन जमावावर लक्ष ठेवणे सोपे जाते. हिंसक जमावावर नियंत्रणासाठी अश्वदल महत्त्वाचं आहे, असं गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. शिर्डीतील वादाबद्दल काय म्हणाले गृहमंत्री? ‘शिर्डी आणि पाथरी बाबत जो वाद निर्माण झाला त्यावरून बंद पुकारला आहे. पाथरी आणि शिर्डी ग्रामस्थांना मुंबईला बोलवून किंवा तिथं जाऊन चर्चा करू. साई मंदिरातील दर्शन सुरू आहे. पोलीस यंत्रणेवर लक्ष ठेवून आहे. शांततेने आंदोलन सुरू आहे,’ असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. CAA वर भाष्य CAAबाबत कपिल सिब्बल यांनी भाष्य केलं होतं. त्यावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, ‘कपिल सिब्बल काय बोलले याची माहिती घेतो, मला कल्पना नाही.’

)







