मानलं गड्यांनो तुम्हाला! कल्याण RPFचे जवानच शिवताहेत मास्क, कर्मचाऱ्यांसाठी तयारी

मानलं गड्यांनो तुम्हाला! कल्याण RPFचे जवानच शिवताहेत मास्क, कर्मचाऱ्यांसाठी तयारी

' आज कोरोनाचं मोठं संकट आलंय त्यामुळे आम्ही त्याविरुद्ध पूर्ण ताकदीने लढणार आहेत.'

  • Share this:

कल्याण 28 मार्च :  कोरोनाने सगळ्या जगाची परिस्थितीच बदलवून टाकली. अर्धे जग आज घरामध्ये बंद आहे. प्रशासनाच्या सगळ्याच विभागाचे अधिकारी हे फक्त कोरोनाविरुद्ध लढत आहेत. इतर सगळी कामं बाजूला पडली असून लोकांचे जीव कसे वाचवता येतील आणि कोरोनाला कसा अटकाव करता येईल यावर सगळ्यांचं लक्ष केंद्रीत झालं आहे. युद्ध काळात जसा सर्व देश एकत्र येतो. तसं आता कोरोनाविरुद्ध देश एकवटला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा उपयोग होते. आता प्रत्येकालाच मास्क हवा असल्याने मास्कचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कमतरता राहू नये म्हणून  RPFच्या जवानांनी आता स्वत:च मास्क शिवण्याचं काम हाती घेतलंय. त्यांच्या या पुढाकाराचं कौतुक होत आहे.

सध्या बाजारात मास्कचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे कर्तव्यावर असेलेल्या पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांनाही मास्क उपलब्ध होतं नाहीत. त्यामुळे कल्याणच्या RPF जवानांच्या युनिटने हे मास्क तयार करण्याचा निर्णय घेतला. ज्या जवानांना शिवणकलेची माहिती आहे. अशा जवानांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय.

हे जवान दररोज 2 हजार मास्क तयार करणार आहेत. सुरक्षा जवान, रेल्वेचे कर्मचारी, गँगमन, त्याचबरोबर इतर प्रवाशांनाही हे मास्क दिले जाणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

हे वाचा -  महाराष्ट्रातून बाहेर पडण्याचा धक्कादायक VIDEO, पोलीस ही गेले चक्रावून!

कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही हे जवानांना शिकवलं जातं. संकटकाळात हे तत्व लागू पडत. आज कोरोनाचं मोठं संकट आलंय त्यामुळे आम्ही त्याविरुद्ध पूर्ण ताकदीने लढणार असल्याचं मत या जवानांनी व्यक्त केलं आहे.

कोरोनाविरूद्धच्या लसीचा शोध लागला?

जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलाय. जगभर त्यावर संशोधन सुरू आहे. कोरोनावर ‘लस’च नसल्याने सगळं जग चिंतेत आहे. लस शोधण्यासाठी त्यावर संशोधनही सुरू आहे. जगभरातल्या सर्व संस्था, शास्त्रज्ञ प्रयोग करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हैदराबाद विद्यापीठाच्या एक संशोधक सीमा शर्मा यांनी त्यावर ‘लस’ शोधल्याचा दावा केलाय. विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रक काढून संशोधनाची महिती दिली आहे.

हे वाचा -  सावधान! महाराष्ट्रात वृद्धांपेक्षा तरुणांना Coronavirus बनवतोय आपला शिकार

सीमा शर्मा या हैदराबाद विद्यापीठाच्या बायो केमेस्ट्री डिपार्टमेंटच्या स्कूल ऑफ लाइफ साइंसेजच्या सदस्य आहेत.

टी सेल एपिटोप्स असं त्या लसीला नाव देण्यात आलंय. कोरोनाच्या वाढीला यामुळे अटकव होऊ शकतो असा त्यांनी दावा केलाय. सगळ्या लोकांसाठी या लसीचा उपयोग होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र या लसीच्या आणखी टेस्टींग करण्याची गरज आहे. त्यानंतरच त्याविषयी निर्णय घेता येईल असही त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2020 04:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading