मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अखेर राज्य सरकारचं एक पाऊल मागे, उजनीच्या पाण्याचा आदेश रद्द

अखेर राज्य सरकारचं एक पाऊल मागे, उजनीच्या पाण्याचा आदेश रद्द

गेल्या आठवड्याभरापासून सोलापूरमध्ये आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरले होते.

गेल्या आठवड्याभरापासून सोलापूरमध्ये आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरले होते.

गेल्या आठवड्याभरापासून सोलापूरमध्ये आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरले होते.

बारामती, 27 मे : गेल्या काही दिवसांपासून उजनी धरणाच्या (Ujani Water Dispute) पाण्यावर वाद पेटला होता. अखेर आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे राज्य सरकारला (MVA Goverment) एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे.  जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी काढलेला तो आदेश लेखी रद्द करण्यात आला आहे.

जयंत पाटील यांनी 18 मे रोजी उजनी धरणातून सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूरला देणार नाही. तसा या पूर्वी काढलेला सर्वेक्षण आदेश रद्द करण्याचे तोंडी सांगितले होते. परंतु, जोपर्यंत लेखी आदेश मिळत नाही.तोपर्यंत आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. अखेर आज उप सचिव यांनी 22 एप्रिल 2021 रोजी काढलेला आदेश रद्द केल्याचे पत्र काढले आहे.

अरे बापरे! तोंडाबाहेर लटकतेय जीभ; कोरोना रुग्णाला झाला भलताच साइड इफेक्ट

गेल्या आठवड्याभरापासून सोलापूरमध्ये आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाची धग बारामतीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या निवास्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील उजनी पाणी प्रश्न घेऊन शेतकरी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दारात बसले होते. उजनी धरणातून बारामती आणि इंदापूर जिल्ह्याला पाणी देण्यास विरोध करत उजनी बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते इस्लामपूर याठिकाणी मंत्री जयंत पाटील यांच्या कारखान्यासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार होते.

ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टीन लँगर यांचे पद धोक्यात! बोर्डाने दिला गंभीर इशारा

यावेळी पोलिसांनी कारखान्यावर थांबवून ठेवले. पोलिसांनी मज्जाव केल्याने यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. तर याची दखल घेत पाटील यांनी  त्वरित हा आदेश रद्द करण्यात आला आहे असं स्पष्ट केलं. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

First published:
top videos

    Tags: Jayant patil