मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अरे बापरे! तोंडाबाहेर लटकतेय जीभ; कोरोना रुग्णाला झाला भलताच साइड इफेक्ट

अरे बापरे! तोंडाबाहेर लटकतेय जीभ; कोरोना रुग्णाला झाला भलताच साइड इफेक्ट

कोरोना रुग्ण गंभीर असा कोविड टंग (Covid tongue) झाला आहे.

कोरोना रुग्ण गंभीर असा कोविड टंग (Covid tongue) झाला आहे.

कोरोना रुग्ण गंभीर असा कोविड टंग (Covid tongue) झाला आहे.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 27 मे: कोरोनाची लागण (Coronavirus) झाल्यानंतर आरोग्याच्या इतर अनेक समस्या उद्भवत आहेत. त्याचे गंभीर दुष्परिणाही दिसून येत आहेत. संसर्गातून बरं झालेल्यांनाही अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन (Post covid complication) दिसून येत आहेत. सध्या भारतात कोरोनातून बरं झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यात आता अमेरिकेत कोविड टंगचं गंभीर स्वरूप दिसून आलं आहे.

कोरोनाव्हायरस फक्त फुफ्फुसचं नाही तर शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरही परिणाम करता दिसतो आहे किंवा कोविड-19 आजारामुळे किंवा त्यावरील उपचारासमुळेसुद्धा इतर समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यूएसच्या हॉस्टनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला कोविड टंग (Covid tongue) झालं आहे. तशी याआधीसुद्धा कोविड टंगची काही प्रकरणं समोर आली आहेत. पण या व्यक्तीमध्ये ही समस्या अधिक तीव्र असल्याचं दिसतं आहे. त्याची जीभ फक्त सूजलीच (Swelling on tongue) नाही तर त्याचा आकारही वाढला आहे.

अँथनी जोनस असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. उपचारानंतर त्याची जीभ इतकी सुजली की त्याला खाणं-पिणं आणि बोलणंही शक्य होत नाही आहे.

हे वाचा - Cocktail Drug घेणाऱ्या पहिल्या कोरोना रुग्णाचा रिपोर्ट; पाहा कसं काम करतंय औषध

जिभेला येणारी सूज आणि आकार वाढणं याला वैद्यकीय भाषेत मॅक्रोग्लोसिया म्हणतात. डेली मेलच्या रिपोर्टनुसार या समस्येचा अधिक अभ्यास करणारे आणि अँथनीवर उपचार करणारे डॉ. जेम्स मेलविले यांनी सांगितलं, अशी समस्या असलेले 9 कोरोना रुग्ण दसून आले आहेत. तशी ही परिस्थिती सामान्य आहे. पण या रुग्णाइतकी गंभीर कधीच नसते. पण या रुग्णामध्ये आजाराची जी तीव्रता दिसून आली आहे ती अतिशय दुर्मिळ आहे.

डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली आणि अधिकची जीभ काढून टाकली आहे. पण यामागील नेमकं कारण माहिती नाही. याबाबत अनेक शक्यता डॉक्टरांनी वर्तवल्या आहेत.

सामान्यपणे मॅक्रोग्लोसिया हा स्ट्रोकमुळे किंवा एखाद्या व्यक्तीला भरपूर वेळ पालथं झोपवल्यानं होतं. जोनस यांनाही रुग्णालयात पालथं झोपवण्यात आलं होत. जेणेकरून त्यांना श्वास घेणं सोपं होईल. कदाचित त्यामुळेच त्यांची जीभ सूजली असावी. पण सर्व रुग्णांच्या बाबतीत असं झालं नाही.

हे वाचा - Black Fungusच्या रुग्णांना दिलासा, भारतात Zydus Cadila आणि TLC उपलब्ध करणार औषध

डॉ. मेलविले म्हणाले, कदाचित कोरोनाशी संपर्कात आल्यानंतर शरीरातील इतर अवयवांना येणारी सूज हे यामागील कारण असेल. काही रुग्णांच्या किडनी, फुफ्फुस आणि हृदयामध्येही आम्हाला असाच बदल दिसून आला. ही समस्या असलेला 9 पैकी 8 जण हे कृष्णवर्णीय आहेत. लोकांना angioedema समस्या असण्याची शक्यता जास्त असू शकते. म्हणजे त्यांचं शरीराचा काही भाग हा एखाद्या अॅलर्जिक रिअॅक्शनमुळे किंवा आनुवंशिकतेमुळे सुजू लागतो. श्वेतवर्णीयांपेक्षा कृष्णवर्णीयांमध्ये ही समस्या जास्त असते.

या व्यक्तीला ही समस्या इतक्या तीव्र प्रमाणत उद्भवण्याची शक्यता यापैकीच काही असावी. कोरोनामुळे उद्भवणारं मॅक्रोग्लोसिया आपोआप बरं होणार नाही. त्यावर योग्य उपचार घेण्याची गरज आहे. जोनसवर सध्या तसेच उपचार सुरू आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Covid-19, Side effects