सिडनी, 27 मे: ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर (Justin Langer) यांना पदावर राहयचं असेल तर त्यांनी कोचिंगच्या शैलीत कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल करावा लागेल. 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया' ने (Cricket Australia) हे क्रिकेट सत्र संपल्यानंतर लँगर यांच्या कामाची समीक्षा केली. त्यानंतर हा इशारा दिला आहे. 'सिडनी मॉर्निंग हेरल्ड' ने याबाबतचे वृत्त दिले आहे. ऑस्ट्रेलियाचे 40 खेळाडू आणि सहयोगी स्टाफने दिलेली प्रतिक्रिया लँगर यांना कळवण्यात आली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियाने अनेक प्रमुख खेळाडू जखमी असूनही जबरदस्त कमबॅक केले आणि टेस्ट सीरिज 2-1 ने जिंकली. त्यानंतर काही खेळाडूंनी लँगर यांच्या शैलीवर नाराजी व्यक्त केली होती.
डॅरेन लेहमन यांनी 2018 साली बॉल टेम्परिंग प्रकरणात पदाचा राजीनामा दिल्यानंतर लँगर यांची चार वर्षांसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीमचे मॅनेजर गोविन डोवे यांच्याबद्दलही खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडूंच्या या प्रतिक्रियेनंतर लँगर काय स्पष्टीकरण देणार यावर त्यांचा कार्यकाळ वाढणार की नाही, हे ठरणार आहे.
रमेश पोवार कोच झाल्यानंतर कॅप्टन मिताली राजची पहिली प्रतिक्रिया, वाचून वाटेल अभिमान
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय टीमचे प्रमुख बेन ओलिवर यांनी वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हंटले आहे की, "मागील वर्ल्ड कप आणि 2019 साली झालेली अॅशेस मालिकेनंतरही ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्या दोन्ही स्पर्धेत टीमने चांगली कामगिरी केली होती. ही पद्धत आमची मैदानावरील आणि मैदानाच्या बाहेर सुधारणा पद्धतीचा भाग आहे. या पद्धतीचा आगामी टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या अॅशेस मालिकेत उपयोग होईल,' अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Career, Cricket news, Sports