मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आमदार श्वेता महालेंच्या दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी; गोविंदा जखमी, काय घडलं?

आमदार श्वेता महालेंच्या दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी; गोविंदा जखमी, काय घडलं?

फाईल/प्रतिकात्मक फोटो

फाईल/प्रतिकात्मक फोटो

कार्यक्रमामध्ये झालेल्या या हाणामारीत एक गोविंदा जखमी झाला आहे. दहीहंडी फोडण्यासाठी याठिकाणी अनेक गोविंदा जमले होते.

  राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा 20 ऑगस्ट : शुक्रवारी राज्यभरात दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा केला गेला. सर्वांनी या उत्सवाचा आनंद घेतला. काही ठिकाणी थर रचताना काही गोविंदा जखमी झाल्याच्या बातम्याही समोर आल्या. मात्र, बुलडाण्यातून आता धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले आणि भाजपा युवा मोर्चाने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी झाली.
  दहीहंडी फोडण्यासाठी सहाव्या थरावर पोहोचला, संघ कोसळला, तो लटकला, पुण्यातला चित्तथरारक VIDEO कार्यक्रमामध्ये झालेल्या या हाणामारीत एक गोविंदा जखमी झाला आहे. दहीहंडी फोडण्यासाठी याठिकाणी अनेक गोविंदा जमले होते. यावेळी डॉल्बीच्या धुंदीत नाचताना जमावाने एका गोविंदाला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. ही मारहाण नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यानंतर कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. जन्माष्टमीदिवशी मोठी दुर्घटना; आरतीसाठी जमलेल्या गर्दीमुळे गुदमरून दोघांचा मृत्यू, अनेकजण बेशुद्ध दहीहंडी मंडळात सुरुवातीला वाद झाला. यानंतर जमावाने या युवकाला तीन मिनिटं बेदम मारहाण केली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे पोलिसांनी एवढ्या गर्दीमध्ये जाऊन तरुणाला वाचवणं शक्य न झाल्याने तीन मिनिटे जमावाने त्याला मारलं. मध्यरात्रीपर्यंत दहीहंडी कार्यक्रमात अक्षरशः युद्धभूमी सदृश परिस्थिती होती. यानंतर हा वाद शांत झाला. मात्र, गर्दीमध्ये घडलेल्या या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. घटनेत गोविंदाही जखमी झाला. शेवटी घाईघाईत दहीहंडी फोडण्यात आली आणि हा कार्यक्रम संपविण्यात आला.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Crime news

  पुढील बातम्या