लखनऊ 20 ऑगस्ट : जन्माष्टमीच्या दिवशी संपूर्ण देश भगवान श्रीकृष्णाच्या पूजेत मग्न असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात रात्री उशिरा दर्शनासाठी आलेल्या गर्दीत दोघांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गर्दी इतकी होती की मंगला आरतीच्या वेळी गुदमरून 50 हून अधिक लोक बेशुद्ध पडले. VIDEO : दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट, रत्नागिरीत गोविंदाचा मृत्यू, धक्कादायक घटना गर्दी वाढल्याने हा अपघात झाल्याचं एसएसपी अभिषेक यादव यांनी सांगितलं आहे. नोएडा येथील रहिवासी निर्मला देवी आणि जबलपूर मूळचे रहिवासी 65 वर्षीय रामप्रसाद विश्वकर्मा अशी घटनेत मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. बेशुद्ध झालेल्या भाविकांना पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं, तर जवळपास सहा जणांवर उपचार सुरू आहेत. मृतांच्या नातेवाईकांच्या विनंतीवरून पोलिसांनी शवविच्छेदन न करता मृतदेह ताब्यात दिला. जन्माष्टमीला वर्षातून एकाच दिवशी मंगला आरती होत असल्याने याठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते. याच गर्दीमध्ये गुदमरल्याने ही दुर्घटना घडली आहे. दहीहंडीत मोठी दुर्घटना, थर रचताना तोल गेला आणि घात झाला, सहाव्या थरावरुन गोविंदा कोसळला मंदिराच्या सेवकांचा असा दावा आहे की अधिकाऱ्यांनी व्हीआयपीच्या आपल्या कुटुंबातील सदस्यांना विशेष सुविधा दिल्या. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, एक वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याच्या आईला घेऊन आला होता. मंगला आरतीमध्ये मथुरा रिफायनरीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी कुटुंबातील 7 सदस्यांसह उपस्थित होते. टेरेसवर बांधलेल्या बाल्कनीतून अधिकाऱ्यांचे नातेवाईक दर्शन घेत होते, असं सेवादारांनी सांगितलं. त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांनी वरच्या मजल्यावरचे दरवाजे बंद केले होते. त्यामुळे लोकांना वाचवणे कठीण झाले, असा आरोप केला गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.